शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात शिवसेनेच्या वतीने बॅँकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:49 IST

नांदगांव : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकºयांना रोख स्वरूपात देण्यात यावे याबाबत बुधवारी (दि.१२) आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदगांव तालुक्याच्या वतीनेशहरातील बँकांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनांदगाव : अनुदान कर्ज खात्यात जमा करण्यास विरोध

नांदगांव : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकºयांना रोख स्वरूपात देण्यात यावे याबाबत बुधवारी (दि.१२) आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदगांव तालुक्याच्या वतीनेशहरातील बँकांना निवेदन देण्यात आले.अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शेती पिकांच्या नुकसानीमुळे पिकांवर झालेला खर्च देखील मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालीआहे.त्यामुळे शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनामार्फत शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली. परंतु ज्या शेतकºयांकडे बँकांचे कर्ज थकबाकी आहे. अशा शेतकºयांच्या अनुदानाची रक्कम शेतकºयांना रोख स्वरूपात न देता बँकांमार्फत परस्पर कर्ज खात्यात जमा करण्यात येत आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर आदी कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मिळणारे नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकºयांना रोख स्वरूपात देण्यात यावे असे शासनाचे आदेश आहेत.तसेच त्याबाबत शासन निर्णय देखील करण्यात आलेला आहे. तरीही बँका शतकºयांचे नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा करत आहे. त्यामुळे नांदगांव शहरातील भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, कॉर्पोरेशन बँक आदी बँकांना आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यापुढे नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा केल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.यावेळी तालुका प्रमुख किरण देवरे, माजी तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप, शहर प्रमुख सुनील जाधव, प्रमोद भाबड, सागर हिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक