मनमाड : मुंबई - नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसच्या मनमाड येथे थांबण्याच्या वेळेत कपात करण्यात आली असून, आता ती फक्त ५ मिनिट थांबणार आहे. तसेच नांदेड दौड पॅसेंजरच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन्ही गाड्यांच्या मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस (क्र.१७६१२ डाउन) मनमाड येथे २३.२५ व निघण्याची वेळ २३.५५ अशी होती. यात बदल केला असून, नवीन वेळेनुसार ही गाडी मनमाडला येण्याची वेळ २३.२५ येऊन लगेचच २३.३० निघणार आहे. राज्यराणी एक्सप्रेस पूर्वी येथे तीस मिनिटे थांबत होती. नांदेड - दौंड पॅसेंजर मनमाडला ५.१५ येऊन ५.२० सुटत होती. आता ही पॅसेंजर मनमाड रेल्वे स्थानकावर ५ वाजता येणार असून ५.०५ मिनिटांनी सुटणार आहे.
मनमाड येथे राज्यराणी फक्त ५ मिनिट थांबणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:14 IST
मनमाड : मुंबई - नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसच्या मनमाड येथे थांबण्याच्या वेळेत कपात करण्यात आली असून, आता ती फक्त ५ ...
मनमाड येथे राज्यराणी फक्त ५ मिनिट थांबणार !
ठळक मुद्देनिर्णय : दौंड पॅसेंजरच्या वेळेतही केला बदल