शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

रामदास वाघ, सप्तर्षी माळी, राजेंद्र उगले यांचा समावेश नाशिक : जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या एकोणिसाव्या वर्धापनदिनामित्त राज्यस्तरीय पुरस्कारांची ...

रामदास वाघ, सप्तर्षी माळी, राजेंद्र उगले यांचा समावेश

नाशिक : जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या एकोणिसाव्या वर्धापनदिनामित्त राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या पुरस्कारांचे वितरण जानेवारीत नियोजित पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली.

लोणार येथील डाॅ. विशाल इंगोले यांच्या ‘माझ्या हयातीचा दाखला’ या काव्यसंग्रहाला सूर्योदय साने गुरुजी पुरस्कार (२१०० रु. व गौरवपत्र), सूर्योदय काव्यसरिता पुरस्कार नाशिकच्या अभिषेक नासिककर यांच्या ‘समांतर’ या काव्यसंग्रहाला (१५०० रु. व गौरवपत्र), सूर्योदय काव्य पुरस्कार ठाणे येथील रामदास खरे यांच्या ‘आता अटळ आहे’ या काव्यसंग्रहाला, सूर्योदय काव्यरत्न पुरस्कार धुळे येथील प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘शब्दचित्र’ या काव्यसंग्रहाला, सूर्योदय शब्दमाऊली पुरस्कार नांदेड येथील डाॅ. योगिनी सातारकर- पांडे यांच्या ‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’ या काव्यसंग्रहाला (प्रत्येकी ११०१ रु. व गौरवपत्र), मुंबई येथील अनुराधा नेरुरकर यांच्या ‘सलणारा सलाम’ या संग्रहाला सूर्योदय ललित साहित्य पुरस्कार ( २५०० रु. व गौरवपत्र), स्व. गिरिजा कीर यांच्या स्मरणार्थ सूर्योदय कथा पुरस्कार नाशिक येथील सप्तर्षी माळी यांच्या ‘फिंद्री’ या कथासंग्रहाला, जळगाव येथील दीपक तांबोळी यांच्या ‘रंग हळव्या मनाचे’ या कथासंग्रहाला, कापूसवाडी येथील प्रा. डाॅ. युवराज पवार यांच्या ‘शिकार’ या कथासंग्रहाला (प्रत्येकी १५०० रु. व गौरवपत्र), कै. शांताराम महाजन यांच्या स्मरणार्थ घुणकी येथील डाॅ. श्रीकांत पाटील यांच्या लाॅकडाऊन या कादंबरीला सूर्योदय कादंबरी पुरस्कार (२५०० रु. व गौरवपत्र), कापडणे येथील रामदास वाघ यांच्या ‘बाहुली माझी लाडकी’ या बालकाव्यसंग्रहाला सूर्योदय बालकाव्यरत्न पुरस्कार (२५०० रु. व गौरवपत्र), पुणे येथील ऊर्मिला निनावे यांच्या ‘फुलवाडी’, नाशिक येथील राजेंद्र उगले यांच्या ‘थांब ना रे ढगोबा’ व एकुर्का रोड येथील रसुल पठाण यांच्या ‘निसर्गाशी जुळवू नाते’ या बालकाव्यसंग्रहांना सूर्योदय बालकाव्य पुरस्कार (प्रत्येकी ७०१ रु. व गौरवपत्र), पुणे येथील संजय ऐलवाड यांच्या ‘बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा’ या बालकथासंग्रहाला सूर्योदय बालकथा पुरस्कार (११०० रु. व गौरवपत्र) जाहीर झाला आहे.

परीक्षक म्हणून डाॅ. मथू सावंत, ॲड. विलास मोरे, सावळीराम तिदमे, साहेबराव पाटील, डी. बी. महाजन व प्रवीण लोहार यांनी काम पाहिले.