नाशिक : चंद्रपूर येथे जानेवारी २०१५ च्या महागाई भत्त्याची घोषणा करूनही अद्याप त्यासंदर्भात शासन निर्णय होत नसल्याने राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित राहिल्याचा आरोप सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कार्याध्यक्ष महेश आव्हाड यांनी केला आहे.पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे २०१५ च्या महागाई भत्त्याची नस्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्ण झाली असूनदेखील अद्याप शासन निर्णय निघत नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै २०१५चाही महागाई भत्ता दिला. परंतु राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१५चा महागाई भत्ता देण्यास दिरंगाई केली जात असून, अशी वेळ कर्मचाऱ्यांवर प्रथमच आली असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
राज्य कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित
By admin | Updated: October 9, 2015 23:07 IST