शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन यंत्राद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:35 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभगातर्फे अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन  यंञाद्वारे सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभगातर्फे अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन  यंञाद्वारे सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर यावर्षी झालेल्या जोरदार पावसाने मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दुरावस्था झाली होती. सदर रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी या नागरिकांच्या मागणीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. अस्वली ते नांदूरवैद्य या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर रस्त्याची आॅस्ट्रेलियन पद्धतीने यंञाच्या साहाय्याने दुरूस्ती करण्यात येत असल्याने प्रथमत: रस्त्यावर असलेल्या खड्ड्याची स्वच्छता करण्यात येऊन या खड्ड्यामध्ये यंञाद्वारे खड्डा पुर्णपणे बुजविन्यात येतो. यामुळे रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी मनसेचे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे तसेच परिसरातील नागरिकांनी केली असून तसेच प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. या रस्त्याला अनेक वर्षांपासून पथदीप नसल्यामुळे राञी अपराञी या रस्त्यावर हिंस्ञश्वापदांचा वावर असल्याने तसेच गोंदे येथील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर परिसरातुन कामगार राञीच्या वेळी कामाला जात येत असल्यामुळे या ठिकाणी पथदिपांची सोय करण्यात यावी अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.-----------------अस्वली ते नांदूरवैद्य या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.सदर रस्त्याला अंधाराचे साम्राज्य असल्याने या ठिकाणी पथदिपांची सोय करण्यात यावी. तसेच या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी वाढीव निधीसाठी पाठपुरावा करणार असून कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची गरज आहे. - गणेश मुसळे, ग्रामस्थ, नांदूरवैद्य

टॅग्स :Nashikनाशिक