शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संपर्कात आलेल्या व्यक्तींवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 00:19 IST

कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी वैद्यकीय उपचार देत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून न जाता सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी केले.

ठळक मुद्देखबरदारीचा उपाय : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे समुपदेशन

लासलगाव : कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी वैद्यकीय उपचार देत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून न जाता सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी केले.कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांची निफाड च्या प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी बुधवारी भेट घेऊन त्यांचे समुपदेशन करून घबराट दूर केली. सदर रूग्णावर उपचार सुरू असुन त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच घरी पाठविले जाईल. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून लवकर बरे व्हाल अशा शुभेच्छा देत त्यांनी या सर्वांच्या मनातील भीती दूर करण्यात यश प्राप्त केले.वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी वैद्यकीय सुविधा,औषधे पुरवून देखरेख केली. त्यामुळे बरे झाल्यानंतर देखील काही काळ चांगला आहार व काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी देखील संवाद साधला. यावेळी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, मंडल निरीक्षक विजय आहेर, तलाठी शिर्के आदी उपस्थित होते.च्कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात असलेल्या १७ जणांना नाशिकच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले असून यापैकी नऊ रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या नऊ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. यापैकी एकास होम कॉरण्टाइन तर उर्वरित आठ जणांना विशेष कोरोना देखरेख व उपचार कक्षात विशेष अ‍ॅम्बुलन्सने आणले आहे. पूर्वीचे नऊ व नवीन आलेल्या आठ अशा एकूण सतरा संशयितांची देखभाल,उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी दिली. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये कमी धोका असलेले दहा संशयित सापडले असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.करोनाबाधित रु ग्णासोबत नगर येथे गेलेल्या ९ व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एकाच ठिकाणी कॉरण्टाइन केलेले आहे. त्यांच्यावर महसूल,आरोग्य व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहेत. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य