नाशिक : मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळच्या सत्रातील शाळा मध्येच सोडण्यात आल्या होत्या, तर दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. जोरदार अतिवृष्टीमुळे बुधवारी (दि. ३) शाळांना प्रशासनातर्फे सुटी जाहीर करण्यात आली होती, परंतु पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी (दि. ४) शाळा, महाविद्यालये नियमित सुरू राहणार आहेत.मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सुरक्षिततेची बाब म्हणून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. शाळांनीही आपली जबाबदारी ओळखून मंगळवारी विद्यार्थ्यांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक शाळांमधून पालकांना आपल्या पाल्यांना घेऊन जाण्याबाबतचे लघुसंदेश मोबाइलवर पाठविण्यात आले होते.
आजपासून शाळा नियमित सुरू
By admin | Updated: August 4, 2016 01:35 IST