नाशिकरोड : शिंदे येथील लक्ष्मीनगर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.आलठक्कर परिवाराच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी जनग आगळे, नामदेव गायधनी, लीलाबाई गायधनी, जगन्नाथ गायधनी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी, महाबली हनुमान, श्री साईबाबा यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. तसेच कलशपूजन, ग्रंथपूजन, संतपूजन, ध्वजपूजन व वीणा पूजनाने सप्ताहास प्रारंभ झाला. यावेळी सुकदेव मते, रमेश खाडे, भानुदास जाधव, सुरेश गायधनी, ज्ञानेश्वर जगळे, विश्वास बागुल, डी.के. सानप, शंकर साबळे, पुंडलिक आव्हाड, नामदेव मते, कारभारी शिंदे, खंडेराव झगडे, रामचंद्र मुठाळ, आशा जाधव, कल्पना पगार, श्रीकांत जोशी, नामदेव झोमान, शरद सानप, ईश्वर गायधनी, हिरमनी आलठक्कर, माया आलठक्कर, पंकज आलठक्कर, गुलशन आलठक्कर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक कन्हैयालाल आलठक्कर यांनी केले. आभार गोपी आलठक्कर यांनी मानले. सप्ताहामध्ये वैशालीताई काळे व सुवर्णाताई सद्गीर यांचे कीर्तन झाले. शुक्रवार- गीताताई हगवणे, शनिवार- मंजुश्रीताई निकम, रविवारी- शारदाताई जाधव यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी सकाळी ९ ते ११ स्वामी शिवलिंग महाराज लातुरकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा व महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)
शिंदे येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ
By admin | Updated: May 6, 2016 00:15 IST