शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बोगद्यावरील पुलासाठी अतिक्रमण काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:19 IST

भगूर येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी यांचा निषेध करताच पालिकेने रेल्वेला पत्र देऊन शनिवारी (दि.२०) येथील अतिक्र मित दोन टपºया काढण्यात आल्याने लवकरच बोगदा कामास सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देभगूर येथे बंदनंतर कारवाई; रेल्वे बोगदापूल तयार करण्याचा मार्ग मोकळा

भगूर : येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी यांचा निषेध करताच पालिकेने रेल्वेला पत्र देऊन शनिवारी (दि.२०) येथील अतिक्र मित दोन टपºया काढण्यात आल्याने लवकरच बोगदा कामास सुरुवात होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे प्रशासनाला भगूरचा रेल्वे बोगदा पूल तयार करण्यास दीड वर्षांपूर्वी पावणेचार कोटी रु पये दिले होते. बोगदा तयार करण्यास जवळील टपºया मटण मार्केट काढून देण्यास रेल्वेच्या प्रशासनाने पत्र देऊन प्रत्यक्ष पालिका मुख्याधिकारी यांना भेटून विनंती केली होती. परंतु पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी टाळाटाळ केली. यावेळी आम्ही शासनाचे पैसे परत करून बोगदा होणार नाही, असा रेल्वे अधिकारी यांनी राजकीय पक्ष आणि व्यापारी यांना संदेश देताच शिवसेना पक्ष सोडून व्यापारी आणि भाजपा-मनसे यांनी भगूर पालिकेला अतिक्र मण काढून बोगदा कामासाठी सहकार्य करण्याचे निवेदन दिले. प्रत्यक्ष भेट घेतली तरी मुख्याधिकारी यांनी सहकार्य केले नाही, त्यावर व्यापारी राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त करत भगूर शहर कडकडीत बंद केले.यावर जनतेच्या नाराजीनंतर अतिक्रमण काढण्याचे रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन टपºया काढून घेतल्या आणि रेल्वेला आता काम करण्यास जागा मोकळी करून दिली व जसे वाटेल तसे मटणमार्केट सोमवारपासून तोडून दिले जाईल. त्यामुळे लगेचच रेल्वे बोगदा कामास सुरु वात होऊन दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याने नागरिक व्यापारी राजकीय पक्षांनी भगूर नगरपालिकेचे आभार मानले, मात्र व्यापारी व जनतेने आंदोलनाचे अस्त्र दाखविल्याने अनेक वर्षांपासून टाळाटाळ होणारे काम लगेचच सुरू झाले.बोगदा कामासाठी सहकार्याचे आवाहनरेल्वे अधिकारी यांनी राजकीय पक्ष आणि व्यापारी यांना संदेश देताच शिवसेना पक्ष सोडून व्यापारी आणि भाजपा-मनसे यांनी भगूर पालिकेला अतिक्र मण काढून बोगदा कामासाठी सहकार्य करण्याचे निवेदन दिले. प्रत्यक्ष भेट घेतली तरी मुख्याधिकारी यांनी सहकार्य केले नाही, त्यावर व्यापारी राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त करत भगूर शहर कडकडीत बंद केले होते.

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण