शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खोपडी-मिरगाव पूरकालव्याचे काम तात्काळ सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 13:05 IST

सिन्नर: तत्कालिन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरु होऊ न शकलेल्या खोपडी-मीरगाव पूरकालव्याचे थांबलेले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वित्त विभागामार्फत ७२ कोटींहून अधिक निधी देण्यासही मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश मंत्रालयात बैठक, ७२ कोटींचा निधी मंजूर

सिन्नर: तत्कालिन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरु होऊ न शकलेल्या खोपडी-मीरगाव पूरकालव्याचे थांबलेले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वित्त विभागामार्फत ७२ कोटींहून अधिक निधी देण्यासही मंजुरी देण्यात आली.आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी शासनाच्या काळात सिन्नर तालुक्याच्या पूवर्भागातील अवर्षणग्रस्त भागासाठी हरित संजीवनी देण्याच्या उद्देशाने कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव या दोन पूरकालव्यांना प्रशासकीय मंजुरी मिळवली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजनही झाले होते.जलसंधारण मंत्री शंकरगडाख ,जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,वित्त विभागाचे सचिव राजू मित्तल, जलसंधारण विभागाचे सचिव नंदकुमार, औरंगाबाद जलसंधारण महामंडळाचे मुख्य अभियंता विश्वनाथन यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सुमारे ३६ कोटीची ही योजना सुमारे ७२ कोटींहून अधिक रुपयांना जाईल असे जलसंधारण विभागाच्या अधिका?र्यांनी सांगताच त्यास तात्काळ सुधारित आर्थिक मंजुरी पवार यांनी दिली.यावेळी हिवरे व चोंढी येथील कोटा बंधा?र्यांचे कार्यारंभ आदेश तात्काळ देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.------------------------टाकेद गटातील उपसा सिंचन योजना सुरु होणार..दहावर्षांपासून टाकेद गटात आदिवासी भागात मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजना सुरु होऊ शकलेल्या नाही. मात्र या भागाची आदिवासी लोकसंख्या 90 टक्के नसल्याने अडथळे येत असल्याचा मुद्दा आमदार कोकाटे यांनी मांडून बाळभैरवनाथ सारख्या उपसा सिंचन योजना एनजीओ मार्फत चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली.त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष बाब म्हणून आदिवासी लोकसंख्येची अट शिथिल करत ना नफा ना तोटा तत्वावर टाकेद गटातील उपसा सिंचन योजना एनजीओ मार्फत चालविण्यास परवानगी दिली.त्यामुळे टाकेद गटातील उपसा जलसिंचन योजनाही लवकरच सुरु होणार आहेत. शिवाय हा भाग आदिवासी असल्याने केंद्रसरकारकडून आदिवासी भागासाठी मिळणारा निधी अंतर्गतचीहि जास्तीत जास्त कामे या भागात मंजूर होतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना पवार यांनी अधिका?र्यांना दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक