शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्यस्तरीय भजन स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:11 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात दोनदिवसीय २६व्या कामगार पुरुष व १६व्या महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (दि.२९) सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

पंचवटी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात दोनदिवसीय २६व्या कामगार पुरुष व १६व्या महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (दि.२९) सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या स्पर्धेसाठी धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, चिपळूण आदींसह राज्यभरातील कामगार भजनी मंडळ संघाचे पाचशे कलाकार सहभागी झाले आहेत. यात १९ कामगार भजनी मंडळे तर १९ महिला भजनी मंडळे अशा ३८ संघांनी सहभाग घेतला. भजनी मंडळांनी जय जय रामकृष्ण हरी, अभंग, तसेच गवळण सादर केल्या. राज्यस्तरीय भजनी मंडळात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भजनी मंडळाला १० हजार, द्वितीय ८ हजार तर तृतीय क्रमांकाला ६ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ भजनी मंडळाला ३ हजार रुपये रोख चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय पखवाज, टाळ, हार्मोनियम, तबलावादक यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी भगीरथ काळे, सहायक आयुक्त सयाजी पाटील, विश्वस्त मधुकर जेजुरकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुमित्रा सोनवणे, हर्षद वडजे, नीलेश गाढवे आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त डॉ. घनश्याम कुळमेथे यांनी तर राजेंद्र नाके यांनी सूत्रसंचालन केले. गुरुवारी (दि.३०) सायंकाळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक