शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सतीमाता-सामतदादा यात्रा नियोजन सुरू

By admin | Updated: February 17, 2016 22:50 IST

वडांगळी : उघड्यावर बोकडबळी न देण्याचे प्रांताधिकारी मंगरुळे यांचे आवाहन

वडांगळी : सतीमाता व सामतदादा यात्रेत कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले. भाविकांकडून उघड्यावर बोकडबळी दिले जाऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंगरुळे मार्गदर्शन करीत होते. ही यात्रा माघ पौर्णिमा रविवार, दि. २१ पासून सुरू होणार आहे. पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, रामेश्वर वेंजने, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, सरपंच सुनीता सैंद, उपसरपंच नानासाहेब खुळे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यात्रोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रत्येक विभागाचा एकमेकांसोबत समन्वय असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आराखडा तयार करून पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत व देवस्थान संस्थान यांच्याकडे द्यावा, अशी सूचना डॉ. मंगरुळे यांनी केली. यात्रा काळात कुठेही अनुचित प्रकार घडत असेल तर त्याची तत्काळ माहिती देण्याचे आवाहन डॉ. मंगरुळे यांनी केले. यात्रा काळात विद्युतपुरवठा खंडित झाल्यास ग्रामपंचायत व देवस्थान संस्थानने पर्यायी व्यवस्था करावी व प्रत्येक विभागाने आपला एक प्रतिनिधी पोलीस नियंत्रण कक्षाजवळ ठेवावा, असे त्यांनी सांगितले.यात्रेत हॉटेल व्यावसायिकांनी वाणिज्य गॅस सिलिंडरचा उपयोग करावा. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार खैरनार यांनी दिला. जीवन प्राधिकरणाच्या वतीने यात्रा काळात उपलब्ध असणारे पिण्याच्या पाण्याचे टॅँकर भरून दिले जाणार असल्याची माहिती अभियंता एस. आर. पवार यांनी दिली. यावर्षी प्रथमच वडांगळीसह १४ गाव पाणीपुरवठा योजना करणाऱ्या तलावात पाणी सोडण्यात आले आहे. सदर तलाव यात्रा स्थळाजवळ असून, त्यात पुरेसा पाणीसाठा आहे.देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मंदिर परिसरात रुग्ण तपासणी व औषधोपचाराची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका असणार आहे. यात्राकाळात घाण व दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी भाविकांना फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, नामदेव खुुळे, पोपट सैद, दिनकर खुळे, डॉ. आर. एस. लंघे, संस्थानचे अध्यक्ष अशोक चव्हाण, रवि देशमुख, नितीन परदेशी, ग्रामसेवक एस. एस. धीवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)