शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

साईचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ

By admin | Updated: April 6, 2016 23:11 IST

सुरेगाव रास्ता : हरिपाठासह सामूहिक आरती

 येवला : भगवंत आपल्याला कधीही विसरत नसतो, मात्र आपणच भगवंताला विसरतो. त्यामुळे भगवंताची नेहमी उपासना करा, व्यावहारिक भक्ती करू नका, असे आवाहन आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केले. सुरेगाव रास्ता येथे साईचरित्र पारायण सोहळ्याला दिमाखात सुरु वात झाली असून, या सोहळ्याअंतर्गत आयोजित प्रवचनाप्रसंगी हभप आमदार चिकटगावकर बोलत होते.प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी चिकटगावकर यांच्या हस्ते हरिपाठ व सामुदायिक सार्इंची आरती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब डमाळे, जगन्नाथ ढमाले, वाल्मीक मगर, भजन मंडळाच्या वतीने दिगंबर साबळे, कचरू चव्हाण, यांच्या हस्ते चिकटगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवचनात बोलताना ते म्हणाले, रामकृष्णहरी हा मंत्र भगवंताने मानवी जीवनाच्या उद्धारासाठी दिलेला आहे. राम म्हणजे नीतीचे प्रतीक, कृष्ण प्रीतीचे प्रतीक, तर हरी म्हणजे शांतीचे प्रतीक असल्याचे सांगत रामायण, गीता, भागवत या ग्रंथांमुळे ऊर्जा व शक्ती मिळते. रामायण हे आपणाला कसे वागायचे, तर गीताद्वारे कसे जगायचे, भागवतमुळे कशी मुक्ती मिळते याचे उदाहरणदेखील उपस्थित श्रोत्यांना पटवून दिले. भारतात धर्माला खूप महत्त्व आहे. साईबाबांकडे बघितलं तर कुठली जात व धर्म आहे हे कळत नाही. श्री साईबाबांनी सर्वधर्मसमभाव व मानवतेच्या धर्माचा आदर्श घालून दिला. हे जगातले एकमेव उदाहरण आहे. धर्मशक्ती जमविण्याकरिता संत लागतात. त्यामुळे संतांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही आमदार चिकटगावकर यावेळी म्हणाले. जोपर्यंत धर्म नाही, तोपर्यंत कर्म नाही असे सांगताना ते म्हणाले, धर्माच्या वाटेने जाल तर हित आहे. त्यामुळे संतांच्या सान्निध्यात राहा, देवावर भक्ती करा, असा सल्ला यांनी उपस्थितांना दिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येवर बोलताना ते म्हणाले शरीर अनमोल आहे. सुखाचे जसे सोबती आहेत तसे दु:खाचाही सामना करा. प्रस्ताविक बाबा डमाळे यांनी केले. गुरुवारी (दि. ७) सरला बेट मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता होईल.यावेळी हरिसंपत सोमासे, विठ्ठल चव्हाण, शरद पवार, संजय आसने, साहेबराव भागवत, कृष्णा अहेर, विमल चव्हाण, मनीषा वेताळ, कांता भोसले, ईश्वर सोमासे, विजय ढमाले, आबा सोमासे आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)