शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या बेल महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:16 IST

बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून, पुष्पप्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. महापालिकेच्या उद्यान विभागाचे ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर सह्याद्री देवराईकार अभिनेते सयाजी शिंदे यांची ही संकल्पना आहे. सणाच्या निमित्ताने विविध वनस्पतींची लागवड करावी यासाठी त्यांनी बेल महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, श्रावणात काही

नाशिक : बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून, पुष्पप्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली.महापालिकेच्या उद्यान विभागाचे ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर सह्याद्री देवराईकार अभिनेते सयाजी शिंदे यांची ही संकल्पना आहे. सणाच्या निमित्ताने विविध वनस्पतींची लागवड करावी यासाठी त्यांनी बेल महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, श्रावणात काही अडचणींमुळे बेल महोत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र, आता महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेल रोपांचे वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे. एकूण तीन हजार रोपांचे वाटप येत्या तीन दिवसांत करण्यात येणार आहे.मनपाचे आयुक्त तथा अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण समिती राधाकृष्ण गमे व भारती गमे यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी कार्यक्र मास वृक्ष प्राधिकरण सदस्य श्यामकुमार साबळे, पुंडलिक गिते, नगरसेवक सुनील गोडसे, शिवाजी आमले, कार्यकारी अभियंता महेश तिवारी आदी उपस्थित होते. विभागात राका कॉलनी उद्यान, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, नवीन नाशिक विभागात गणेश चौक बाल उद्यान, संत गाडगे महाराज उद्यान, पाटीलनगर, स्वामी विवेकानंद नगर उद्यान, सातपूर विभागात काळेनगर जॉगिंग ट्रॅक, राज्य कर्मचारी वसाहत उद्यान आदी विभागात रोपे वाटप करण्यात आली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका