ब्राह्मणगाव : येथे महालपाटणे रस्त्यावरील वाकी पांधी शिवारातील म्हसोबा उपबंधाऱ्यातील गाळ काढणी कामाचा शुभारंभ मविप्र उपसभापती राघोनाना अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला. म्हसोबा उपबंधाºयातील सात हजार घनमीटर गाळ काढला जाणार असल्याने या बंधाºयात ८४.९६ दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून, याचा फायदा परिसरातील शेतीला होणार आहे. जलसंधारण विभागामार्फत दीड लाख रुपये खर्चून या उपबंधाºयाचे काम करण्यात येत असल्याची माहिती सहायक अभियंता टी. आर. गुंजाळ यांनी दिली. बंधाºयातून निघणारा गाळ शेतकºयांनी शेतीसाठी घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मविप्र उपसभापती राघोनाना अहिरे, माजी उपसरंपच अनिल खरे, माधव पगार, दत्तात्रय खरे, सामाजिक कार्यकर्ते नथा बापू अहिरे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
गाळ काढणी कामाचा शुभांरभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:14 IST