शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कालभैरवनाथ यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:11 IST

श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांच्या यात्रोत्सवास (लग्नसोहळा) प्रारंभ झाला आहे. दि. २३ ते ३१ मार्चपावेतो होणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरुवात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार येथून वडनेरभैरव येथील भाविक-भक्तांनी कावडीने आणलेल्या पवित्र अशा गंगाजलाने अभिषेक करून झाली. मंदिरापुढे रोज टिपºयांचा व परिसरातील वाघे मंडळींचा जागरणाचा कार्यक्रम होते. रोज रात्री सामुदायिक महाआरती होते. गाव व परिसरातील भाविक देवाला पोशाख (वाघा) देऊन नवस फेडतात.

वडनेरभैरव : श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांच्या यात्रोत्सवास (लग्नसोहळा) प्रारंभ झाला आहे. दि. २३ ते ३१ मार्चपावेतो होणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरुवात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार येथून वडनेरभैरव येथील भाविक-भक्तांनी कावडीने आणलेल्या पवित्र अशा गंगाजलाने अभिषेक करून झाली. मंदिरापुढे रोज टिपºयांचा व परिसरातील वाघे मंडळींचा जागरणाचा कार्यक्रम होते. रोज रात्री सामुदायिक महाआरती होते. गाव व परिसरातील भाविक देवाला पोशाख (वाघा) देऊन नवस फेडतात. बुधवार (दि. २८) सायंकाळी ७ वाजता ग्रामपालिका कार्यालयाजवळ परतीच्या रथाचा फरसाचा व रथ खुंटवण्याचा लिलाव होईल. जास्त बोली बोलणाºया भाविकाला त्या ठिकाणी बैलजोडी जुंपण्याचा मान त्या दिवसाकरता मिळेल. लिलाव घेतलेल्या भाविकाचा मानाचा फेटा, बैलांसाठी तोडा, छबीगोंडा व माथुटी देऊन सत्कार करण्यात येतो. मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. पालखी माळी गल्ली, सावता माळी मंदिर, कुंभार गल्ली, सलादे बाबा, दत्त महाराज मंदिर, मेनरोड, ग्रामपालिकामार्गे मारुती मंदिरापाशी येईल. तेथे कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांचा साखरपुड्याचा कार्यक्र म होईल. सर्वधर्मसमभाव मानून कालभैरवनाथ महाराजांच्या बाजूने भालेराव पाटील व जोगेश्वरीमाता यांच्या बाजूने मुसलमान पाटील (पटेल) पूजेस बसतील. पूजा झाल्यानंतर गावातील जमलेले भाविक पानसुपारी देवाला अर्पण करतील व त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल. पालखी भगवा चौक, साबर गल्ली, सावता माळी चौक मार्गे मंदिरापाशी येईल. मंदिरात आरती होऊन पालखी (छबिना) सोहळ्याची सांगता होईल.  गुरुवारी (दि. २९) सकाळी ८.३० वाजता ज्यांचा मांडव टाकण्याचा मान आहे ते निकम परिवार डहाळे मांडव टाकतील. त्यानंतर सोनाराच्या येथून देवाचे दागिने मिरवणुकीने मंदिरात आणले जातील. सायंकाळी देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. जानवस घरी हळदीचा व दिवट्यांचा कार्यक्र म होईल. रात्रभर मंदिरापुढे मंडळाचा जागरणाचा कार्यक्रम होईल. पहाटे ४ वाजेपर्यंत होमहवनाचा कार्यक्र म सुरू राहील शुक्रवारी (दि. ३०) पहाटे ४ वाजता ज्यांचा मान आहे असे चौधरी, परीट व इतर मानकरी देवाचे तेलवन पाडतील. त्यानंतर महापूजा होईल. महापूजेनंतर ज्यांचा मान आहे असे मानकरी प्रत्यक्ष श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांची मूर्ती मंदिरातील गाभाºयातून उचलून रथात ठेवतील. यावेळी वाजतगाजत आलेल्या मुसलमान पाटलाची (पटेल) बैलजोडी रथाला जोडण्यात येईल. रथाचे सारथ्य मानकरी तिडके परिवार करतील. रथाच्या मागे ज्यांचे नवस असतात अशा महिला दंडवत घालतात व पुरु ष लोटांगण घालतात. यात्रेचे नियोजन यात्रा कमिटी व देवस्थान टस्ट अध्यक्ष योगेश साळुंके, उपाध्यक्ष विलास पाचोरकर, संतोष सलादे, सरचिटणीस दत्ता शिंदे, चिटणीस लखन जाधव, अभिजित पाचोरकर, खजिनदार मुकेश वाघ, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब तिडके, चिटणीस तुकाराम वक्टे, सदस्य अनिल पवार, रामदास पाचोरकर, राजाराम भालेराव, सरपंच रावसाहेब भालेराव, यात्रा कमिटी सदस्य राजेंद्र निखाडे, सुरेश वक्टे, राजेंद्र भोसले, राजेंद्र किरकाडे, हरिभाऊ पाचोरकर, गणेश परदेशी, अमित माळी, तुकाराम गांगुर्डे व इतर सदस्य करीत आहेत.कालभैरवनाथ, जोगेश्वरीमातेचे पूजनरथ माळी गल्ली, सावता माळी चौक, कुंभार गल्ली, सलादे बाबा, दत्त मंदिर, मेनरोड, ग्रामपालिका चौक, मारुती मंदिर, शनी चौक, बाजारपेठ, पवार गल्ली कोपरा, कोळीवाडामार्गे नेत्रावती नदीवर येईल. तेथे चढ्याबाबाचा चढ चढून जाण्याचा लिलाव होईल. लिलावात बाहेरगावाहून आलेले पाहुणे बोली लावतील. लिलावात जास्त बोली लावणाºया पाहुण्यांचे बैल जोडले जातील. पुढे रथ जानुस घरी आल्यावर रथातून कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांच्या मूर्ती उचलून मानकरी मंदिरात ठेवतील. तेथे देवाचे मंगलाष्टके होऊन विवाह होईल. बाजूलाच देवस्थान ट्रस्टच्या जागेमध्ये कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक