शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेस सुरळीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:22 IST

सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.

ठळक मुद्देकॉपीमुक्त वातावरणात पेपर लिहीत होते.

सिन्नर येथील एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारात तपासणी करताना शिक्षक.

 

सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.सिन्नर शहरात महात्मा फुले आणि वाजे विद्यालय अशा दोन कस्टडी असून, त्यांच्या अंतर्गत ७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. गटशिक्षण अधिकारी एस. जी. निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. वाजे विद्यालयाअंतर्गत सिन्नर महाविद्यालय व दोडी विद्यालय या दोन केंद्रांचा समावेश आहे. या दोन केंद्रांवर एकूण २०८५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर फुले विद्यालयाच्या कस्टडीअंतर्गत एस. जी. पब्लिक स्कूल, फुले विद्यालय, बारागाविपंप्री विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी आणि वडझिरे या पाच केंद्रांचा समावेश आहे. येथून ३०७१ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. शिक्षणविस्तार अधिकारी मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे या दोघांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता ही भरारी पथके परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांवर वचक बसणार असला तरी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र ठेवण्यासाठी संचालकांनाही काळजी घ्यावी घेत आहेत. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७२ सिन्नर केंद्रावर बारावीची परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात सुरळीत सुरू झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. त्यासाठी ७१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची चौकशी करून सोडले जात होते. कॉपीमुक्त वातावरणात पेपर लिहीत होते. संस्था अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरविल्या असून, केंद्र संचालक रघुनाथ एरंडे यांच्यासह शिक्षक कर्मचारी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहे.