शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

वटार येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:40 IST

वटार : आदिवासी बांधवाचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवात सुरुवात झाल्याने या भागात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो.

ठळक मुद्देआदिवाशी बांधवासह ग्रामस्थामध्ये उत्साह

वटार : आदिवासी बांधवाचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवात सुरुवात झाल्याने या भागात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो.हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. त्यावेळेस कडक हिवाळा असतो. हा उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्यभागी उघड्यावर केला जातो. तेथे बाबू किंवा काठी उभे करून कुंपण केले जाते. यात एक प्रवेश द्वार असते. याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात. या खळीच्या मघ्यभागी मांडव टाकला जातो. या मांडवाच्या मघ्यभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जातात.चौकट.....रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदी लयबद्ध नाचतात. या उत्सवात रात्री देवदेवतांचे कथाकथन केले जाते. त्यासाठी थाळी लावण्यात येते. थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्यभागी कुरसाणीच्या झाडाची काठी लावली जाते. या काडीवर जोरात हात वरून खाली ओढल्यावर लयबद्ध असा आवाज येतो. याला ग्रामीण भागात थाळकर मनतात. हा देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्र मासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतात.या उत्सावात सहभागी झालेल्या व्यक्ती भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते. हे दिवसभर परिसरातील गावागावात जावून घरासमोर डोंगºयादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात. दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेंगदाणे देतात. दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात. हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाºयांना व सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी, बिगर तेलाची भाजी, ज्वारी किंवा नागलीची भाकरी प्रसाद म्हणून खायला देतात.या उत्सवाची सांगता मार्गशीष महिन्याच्या पैर्णिमाला होते. पोर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात. या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो. ज्या ठिकाणी गड असतो. तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात. पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते. तेव्हा या डोंगºयादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आणतात. जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात. तेव्हा पुन्हा तिसºया वर्षी हा उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहे.या नंतर गावातील सर्व लोकांकरीता महाप्रसादाचा कार्यक्र म असतो.आमच्या येथे हा ‘डोंगºयादेव उत्सव’ वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधीत घरात प्रवेश करीत नाही. शिव ओलांडत नाही. पंधरा दिवस कडक उपवास करावा लागतो. भूतलावरील वनस्पती, वन्यजीव यांचे संरक्षण संवर्धन व्हावे, मानवजातीचे कल्याण व्हावे, या गावातील वस्तीतील सर्व लोकांचे आरोग्य, सुखसंपदेची भरभराट व्हावी, व सर्व लोक सुख सस्मृध्दीने नंदावते म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते.- तात्याभाऊ सोनवणे.