शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

खोलीकरण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:43 IST

सिन्नर : भोजापूर पूरचारी निºहाळेपासून दुसंगवाडीच्या साठवण तलावापर्यंत पुरेशी रूंद नसल्याने पूर्वभागाला पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने भोजापूर पूरचारीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देभोजापूर पूरचारी : पूर्वभागाला पूरपाण्याचा मिळणार लाभ

सिन्नर : भोजापूर पूरचारी निºहाळेपासून दुसंगवाडीच्या साठवण तलावापर्यंत पुरेशी रूंद नसल्याने पूर्वभागाला पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने भोजापूर पूरचारीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.भोजापूर धरणातील पूरपाणी मिळत नसल्याने पूर्वभागातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली होती. खासदार निधी अथवा केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेतून पूरचारीचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी त्यांच्याकडे साकडे घालण्यात आले होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने सुमारे बारा लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवले होते. हा निधी राज्य वा केंद्राकडून तातडीने मिळणार नसल्याने खासदार गोडसे यांनी पोकलॅण्ड उपलब्ध करून दिले असून, इंधनखर्च जलसंपदा विभाग करणार आहे. त्यामुळे एकप्रकारे लोकसहभागातून हे काम करण्यात येत आहे.निºहाळे येथील वाघ वस्तीपासून पुढे चारीची खोली व रुंदी पुरेशी नसल्याने तेथून पुढे प्राधान्याने दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकºयांची होती. त्यानुसार या कामाचा शुभारंभ खासदार गोडसे व शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार राजभाऊ वाजे यांच्यासह आम्हीदेखील गेल्या वेळी पूरपाणी दुसंगवाडीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यात लोकांचा अपेक्षित सहभाग जाणवला नसल्याची खंत उदय सांगळे यांनी व्यक्त केली. यापुढील काम योग्यपद्धतीने करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन सांगळे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, वावीचे उपसरपंच विजय काटे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संपत पठाडे, डॉ. विजय शिंदे, कानिफनाथ घोटेकर, सतीश भुतडा, प्रशांत कर्पे, जितेंद्र घोटेकर, विठ्ठल उगले, नंदलाल मालपाणी, बाळासाहेब कहांडळ, नबाजी खरात, कचरू घोटेकर, रमेश ढमाले, सुधाकर भगत, नितीन अत्रे, दत्तात्रय आनप, विजय गुरुळे, रमेश गावडे, विष्णू सांगळे, संदीप राजेभोसले, बाळासाहेब काकड, रघुनाथ यादव, भारत यादव, विनायक घेगडमल यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी परिस्थिती सुरुवातीपासून बिकटभविष्यात सिन्नरच्या पाणीप्रश्नावर काम होणार असून, त्यामुळे दुष्काळी तालुका म्हणून असणारी ओळख कायमची पुसली जाणार असल्याचे सांगून गोडसे यांनी वैतरणा-गारगाई नदीजोड प्रकल्पाची माहिती दिली. तालुक्यातील पाण्याची स्थिती सुरुवातीपासूनच बिकट आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे नेहमीच आग्रही असतात, असेही ते म्हणाले.एकजूट व लोकसहभाग वाढवावापूर्वभागासाठी आशेचा किरण असलेल्या भोजापूरचे पूरपाणी शेवटच्या टोकाला दुसंगवाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गोडसे म्हणाले. पाण्याच्या बाबतीत कुणालाही राजकारण करणे परवडणारे नाही. मागील काळात काय झाले याकडे लक्ष न देता पूरचारीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करून घ्यावे. यासाठी एकजूट व लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन गोडसे यांनी यावेळी केले.