शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे फाटा येथे डांबरीकरणास अखेर प्रांरभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:12 IST

नांदूरवैद्य : गोंदे फाटा येथील राष्टÑीय महामार्गावर झालेल्या खडड्यांच्या दुरूस्तीला व डांबरीकरणाला प्रारंभ झाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नांदूरवैद्य : गोंदे फाटा येथील राष्टÑीय महामार्गावर झालेल्या खडड्यांच्या दुरूस्तीला व डांबरीकरणाला प्रारंभ झाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली आहे.अनेक गावांना शहरांशी जोडणा-या नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे यावर्षी सततच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे येथील महामार्गाला मोठमोठे खड्डे पडल्याने या महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून छोट्या मोठ्या अपघातांत वाढ होत आहे. नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने या महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.दररोज हजारो वाहनांची यावरून वाहतूक होत असते.त्यामुळे नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने नागरिक याच महामार्गाने प्रवास करत शहरात दाखल होत असतात.माञ सध्या या महामार्गावरील गोंदे फाटा येथे खड्डेच खड्डे झाल्याने प्रवाशांना हा नक्की " महामार्ग आहे की खड्डेमार्ग " असा प्रश्न पडतो आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक तीन हा नाशिकहून मुंबईकडे जातो.त्यामुळे दररोज येथून हजारो वाहनांची प्रवाशी मालवाहतूक होत असते.माञ यंदाच्या पावसाळ्यात या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याने या महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवण्यात यावे अशी जोरदार मागणी येथील वाहनधारकांनी केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक