निफाड : नैताळे व परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या सोयीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या वतीने नैताळे येथील तात्पुरत्या खरेदी -विक्र ी केंद्रावर आज बाजार समीतीचे सचिव बी.वाय.होळकर यांचे हास्ते द्राक्षमणी लिलावास प्रारंभ करण्यात आला,या केंद्रावर शेतकर्यांचा व व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो. त्यामुळे या वर्षी ही व्यापारी व शेतकर्यांनी मागणी केल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सचिव बी.वाय. होळकर यांचे हस्ते नैताळे येथील केंद्रावर द्राक्षमनी लिलावास प्रारंभ करण्यात आला शेतकरी बांधवानी नैताळे येथील द्राक्षमनी खरेदी-विक्र ी केंद्रावर आपला माल योग्य ती प्रतवारी करु न आणावा असे आवाहन करण्यात आले आहेत .या केंद्रावर व्यापारी वर्ग जास्त असल्याने त्यांच्या स्पर्धेत शेतकर्यांना योग्य भाव मिळु शकतो .भविष्यात शाशकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपला शेती माल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या माध्यमातून विक्र ी करावा असेही या प्रसंगी सांगण्यात आले, यावेळी दत्तात्रय भवर बाजार समीतीचे सहसचिव जी एम आढांगळे , व्हि. बी. खालकर ,व्हि के.जाधव , रामनाथ गोळे , व्यापारी विष्णू गायकर , इकबाल कुरेशी ,अश्पाक शेख , इकबाल शेख , वसंत गांगुर्डे ,मोसिन सय्यद ,बापु धरम , हसन शेख दादाभाई शेख ,यांच्या सह सोमनाथ राखुंडे ,विठोबा देवा बोरगुडे, विकास कराड ,विशाल दादा घायाळ आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
द्राक्षमणी लिलावास प्रारंभ
By admin | Updated: February 15, 2017 23:17 IST