शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

स्वच्छ शहर अभियानात नाशिक महापालिकेचे तारे जमीं पर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 8:27 PM

संजय पाठक, नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत महापालिकेने केलेले स्वयंमुल्यमापन अखेरीस केंद्रीय पथकाकडून नाकारले गेले आहे. महापालिकेने ...

ठळक मुद्देव्यवस्थापनातील त्रुटी उघडमानांकनच सर्व नाही, स्पर्धेतील दोषही स्पष्ट

संजय पाठक, नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत महापालिकेने केलेले स्वयंमुल्यमापन अखेरीस केंद्रीय पथकाकडून नाकारले गेले आहे. महापालिकेने स्वत:ला तीन तारे म्हणजे स्टार दिले होते. परंतुपथकाने मात्र प्रत्यक्ष पाहणी अंती ते एक तारा देऊन महापालिकेला जमिनीवर आणले आहे महापालिकेच्या सेवेतील काही त्रुटी यानिमित्ताने उघड झाल्या आहे. मात्र, वास्तववादी विचार केला तर अशाप्रकारचे मुल्यमापन हाच उत्तमसेवेचा आधार असावा का, आणि स्पर्धेत नंबर यावा यासाठीच चांगली सेवा द्यावी काय, याचा विचार करण्याची गरज आहे.केंद्रशासनाने शहर स्वच्छ ठेवावीत हा उदात्त हेतु मानून देशपातळीवर स्पर्धा सुरू केली. यात सहभागी होणाऱ्या शहरांचे निकष सतत बदलत गेले आहेत. पाच वर्षांपूर्वी स्पर्धा झाली त्यात अवघे शंभर दीडशे शहरे होती, मात्र नंतर ती वाढत अगदी साडे चार हजारावर गेली आहे. त्यात एखाद्या शहराची लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती, तेथील नियम पालन करणा-या समुहाची संस्कृती अन्य सर्वच वेगवेगळी परिस्थती आहे. अगदी महाराष्टÑातील शहरांचा विचारकेले तर अ वर्गाची मुंबई असो आणि नाशिक सारखी ब वर्ग असो तर आणि ड वर्ग महापालिका असो सर्वच शहरांचा गाभा वेगळा आहे. नवी मुंबईसारखे नियोजन बध्द विकसीत केलेले शहर हा आणखीनच वेगळा भाग आहे. सर्वांनाच एका मापाच्या तराजूत तोलले जात आहेत. कोणत्याही सेवेसाठी एक बेंचमार्क असावा, किमान त्या सेवेची पातळी राखली गेली पाहिजे या स्पर्धांमागील उद्देश असला तरी सर्वच महापालिकांची सामाजिक, आर्थिक, परस्थिती, साक्षरता आणि सजगता सारख्या नसतात. त्यामुळे स्पर्धा मुळात कोणाशी कोण करते याचाही विचार झाला पाहिजे. स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत आधी एकदाच डिसेंबर- जानेवारीत देशपातळीवर शहरांची पाहणी करून निकाल घोषीत केला जात. त्यात आता बदल करून वर्षभर दर तीन महिन्यांनी मुल्यमापन केले जाते, ही चांगली सुधारणा आहे. अन्यथा एकमहिना शहर स्वच्छ नंतर मात्र परिस्थिती जैसे थे होत असे. मात्र, त्यातील वेगळे दोष देखील आता उघड झाले आहेत. गेल्या वर्षभर नाशिक महापालिकेचा क्रमांक पहिल्या दहात होता. मात्र, नंतर जानेवारीत स्वयंमुल्यमापनात महापालिकेने स्वत:ला तीन तारे दिले. मात्र, त्याचवेळी पंचवटी आणि सिडको या दोन विभागात घंटागाडी ठेकेदारीचा प्रश्न उभा राहीला. बांधकामाचे मलबे आणि अन्य साहित्य हटविण्याची कोणतीही व्यवस्था नाही असे दोन ते तीनमुद्दे महापालिकेला मारक ठरले असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि, धुळे आणि जळगाव या दोन ड वर्गात मग त्यापेक्षा उत्तम सेवा आहेत, काय याचे वास्तव मुल्यमापन केले गेले का याचाही विचार व्हावा. मुळात स्पर्धा ही स्पर्धा आहे. प्रत्यक्षात ही सेवाही निरंतर आणि गुणवत्तेनुसारच नागरीकांना मिळाली पाहिजे. केंद्रशासनाच्या एकानिकषानुसार नाशिक शहर हागणदारीमुक्त घोषीत करण्यात आले आहे. प्रत्यक्षात तशी स्थिती आहे, काय? राज्यात तत्कालीन ग्राम विकास मंत्री (स्व.) आर. आर आबा यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविले होते त्यातून गावागावात सुधारणा झाली आणि गावांमधील स्पीरीट देखील वाढले. शहरात असा प्रयोग होणे सोपे नाही. बहुतांशी शहरात स्थलांतरीत कष्टकरी तर असताचच परंतु पुण्या-मुंबईपाठोपाठ नाशिकही कॉस्मोपॉलीटीयन होत आहे अशावेळी सर्वांना सजग राहून गावांसारखे स्पिरीट निर्माण करणे सोपे नाही. त्यामुळे स्पर्धेतील गुणांकन- मानांकन हा वेगळा विषय परंतु सेवा कशा मिळतात आणि स्थानिक नागरीक खरोखरीच समाधानी आहेत, काय याबाबत देखील विचार झाला पाहिजे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार