शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती वादावर आता सोमवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:12 IST

शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नाशिक : शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.गुरुवारी (दि.२) भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर तातडीचे म्हणून शुक्रवारी (दि. २८) सुनावणी होणे अपेक्षित होते, परंतु ती होऊ शकली नाही. आता येत्या सोमवारी (दि. २) सुनावणी होणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त, राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे अधिकारी, महापालिकेचे नगरसचिव, शिवसेना गटनेता विलास शिंदे यांना हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहे, असे जगदीश पाटील यांनी सांगितले. न्या. काथावाला आणि छागला यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.जगदीश पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण थोरात, जय भाटिया यांनी काम बघितले. त्यानंतर सोमवारी ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे हे बाजू मांडणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.स्थायी समितीचे ८ सदस्य शनिवारी (दि. २९) निवृत्त होत असून त्यांच्या जागी नूतन सदस्य निवडीसाठी गेल्या सोमवारी (दि.२४) सभा झाली. त्यात भाजपचे चार, शिवसेनेचे दोन आणि कॉँग्रेस तसेच राष्टÑवादीचा एकेक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, भाजपचे दोन नगरसेवक कमी झाल्याने पक्षीय तौलनिक बळ घटले आहे त्यामुळे एक सदस्य शिवसेनेचा वाढतो, असा शिवसेनेचा दावा होता. त्यानुसार नियुक्ती करण्याचे आदेश नगरविकास खात्याने दिले होते. परंतु महापौरांनी सेनेचे दोन सदस्य नियुक्त केले त्यानंतर विभागीय आयुक्तांनी सभापतिपदाची निवड करण्यासाठी ३ मार्च ही तारीख घोषित केली. परंतु पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्तझाले नसल्याचा आक्षेप शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी शासनाकडे घेतला. त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने सदस्य नियुक्तीच्या महासभेच्या ठरावाला अंतरिम स्थगिती दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCourtन्यायालय