शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीची सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:04 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या पक्षीय तौलनिक बळासंदर्भात गुरुवारी (दि. २६) उच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडली आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : संचारबंदीचाही परिणाम

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या पक्षीय तौलनिक बळासंदर्भात गुरुवारी (दि. २६) उच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडली आहे.महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य २९ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. तत्पूर्वी महापौर सतीश कुलकर्णी यांनी २५ फेब्रुवारीस विशेष महासभा घेतली. त्यात आठ सदस्य निवृत्त केले. तथापि, ते पक्षीय तौलनिक बळानुसार नियमानुसार शिवसेनेच्या एका सदस्याची नियुक्ती टाळण्यात आल्याने त्या नगरसेवकावर अन्याय झाल्याची शिवसेनेची भावना आहे. दरम्यान, सभापतिपदाची निवडणूक घोषित झाली असल्याने उच्च न्यायालयाने गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या याचिकेतील हवा निघाल्याची चर्चा होती. मात्र, याचवेळी राज्य शासनाने २५ फेब्रुवारी रोजी महापौरांनी केलेल्या सदस्य नियुक्तीविषयी आयुक्तांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यात आयुक्तांनी महापौरांनी केलेली सदस्यांची नियुक्ती पक्षीय तौलनिक बळाला अनुसरून नसल्याचे प्रतिध्वनीत होत असल्याने शिवसेनेने त्याचा आधार घेत उच्च न्यायालयात पुन्हा आव्हान दिले. त्यावर गेल्या आठवड्यातच सुनावणी होणार होती. मात्र, ती टळली. त्यातच कोरोना प्रकरण सुरू झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अत्यावश्यक दाव्यांनाच प्राधान्य दिले. भाजपकडून गणेश गिते यांनी सभापतिपदाची निवडणूक लढविली. त्यावर शिवसेनेने बहिष्कार घातला असल्याने तातडीने सुनावणी घेऊन हा विषय तडीस लावावा यासाठी भाजपच्या वकिलांनी प्रयत्न केले.मागील सुनावणीच्या वेळीच २६ पर्यंत ती लांबणीवर टाकण्यात आली होती.राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली. पंतप्रधानांनी ती १४ एप्रिलपर्यंत वाढवली. त्यामुळे गुरुवारी (दि. २६) याचिकेवर काहीच सुनावणी झाली नसून ती टळली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका