शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...हा डाग चांगला आहे !

By admin | Updated: February 16, 2017 23:23 IST

व्हॉट्स अ‍ॅप डीपी : ‘अधिकार नव्हे राष्ट्रीय कर्तव्य’, मतदानाची स्मार्ट जागृती

नाशिक : ‘हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे... हा डाग चांगला आहे...’ अशा प्रकारचे प्रबोधन करणारे ‘डीपी’ सध्या व्हॉट््स अ‍ॅपच्या विविध ग्रुप व व्यक्तींचे दिसू लागले आहेत. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने मतदानाची ‘स्मार्ट’ जनजागृती नेटिझन्स्कडून केली जात आहे.महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची सध्या रणधुमाळी शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. नाशिक शहरात महापालिका हद्दीत सुमारे साडेदहा लाख मतदार असून, या मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वच स्तरातून जनजागृती केली जात आहे. मतदान ही लोकशाहीची खरी ताकद असून, मतदानाचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे, असे आवाहन महापालिका, जिल्हा परिषद, निवडणूक आयोग, विविध सामाजिक संघटनांकडून केले जात आहे. या जागृती अभियानामध्ये सोशल मीडियाही मागे राहिला नसून मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने सध्या व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल साइट्सवरून ‘हा डाग चांगला आहे...’ अशी पोस्ट सध्या गाजत आहे. बहुतांश नेटिझन्सकडून ही पोस्ट ‘डीपी’म्हणून अपडेट करण्यात आली आहे. यामुळे सध्या व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक या सोशल साइट्सवरून मतदान जागृती अभियान अप्रत्यक्षपणे राबविले जात आहे. या पोस्टमध्ये ‘वोट, फॉर इंडिया-बेटर इंडिया’ तसेच रात्रंदिवस धडपडणाऱ्या मतदान यंत्रणा अन् लोकशाहीला तुमचे मतदान अपेक्षित आहे... तो तुमचा अधिकार नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे.’ अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आला आहे. यासोबत डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला मतदान केल्यानंतर लावण्यात आलेल्या शाईचा फोटोही अपलोड करण्यात आलेला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. (प्रतिनिधी)