शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची जागा की डम्पिंग ग्राउंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:16 IST

दत्तमंदिररोड एसटी महामंडळाच्या खुल्या जागेवर माती, केरकचरा आणून टाकला जात असल्याने डम्पिंग ग्राउंड झाले आहे. सदर ठिकाणी वाढलेल्या बाभळीच्या झाडांच्या जंगलामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून, रहिवाशांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे.

नाशिकरोड : दत्तमंदिररोड एसटी महामंडळाच्या खुल्या जागेवर माती, केरकचरा आणून टाकला जात असल्याने डम्पिंग ग्राउंड झाले आहे. सदर ठिकाणी वाढलेल्या बाभळीच्या झाडांच्या जंगलामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून, रहिवाशांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. याबाबत महापालिकेच्या नाशिकरोड विभागाने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे़नाशिकरोड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली तरी अद्यापही काही ठिकाणी मोकळ्या जागा आहेत़ दत्तमंदिररोड विकास गतिमंद शाळेशेजारी असलेल्या एसटी महामंडळाच्या मोकळ्या पडीक भूखंडावर मोठ्या प्रमाणात केरकचरा आणून टाकला जात असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच खासगी इमारत बांधताना किंवा मनपाच्या कामाकरिता खोदाई केल्यावर निघणारी माती त्या ठिकाणी आणून टाकली जात असल्याने मातीचा डोंगर झाला आहे. तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडांचे जंगल निर्माण झाल्याने सदर ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गैरकृत्य चालू असतात.बाभळीच्या जंगलात व आनंदनगर येथील एसटी महामंडळाच्या मालकीच्या डेपोत मद्यपींच्या पार्ट्या दिवसभर झडत असतात. व्हाईटनर, अमलीपदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. तसेच प्रेमीयुगुल व महिलांचा वावर या ठिकाणी वाढला आहे.मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानाच्या आतमध्ये व रस्त्यावर बाहेरील बाजूस रिक्षा, चारचाकीमध्ये, दुचाकीवर व झाडाखाली प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असतात. त्यांना कोणी हटकले तर संबंधितास शिवीगाळ, दादागिरी केली जाते. पोलिसांची व्हॅन लांबूनच सायरत वाजवत येत असल्याने पोलीस येण्यापूर्वीच संबंधित सावध होऊन पळून जातात़ त्यांच्यावर कारवाई करावी़एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर खोदकामाची माती व केरकचरा टाकतात़ तसेच सोमाणी उद्यान परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, त्या ठिकाणी उरलेले, उष्टे अन्नपदार्थ टाकतात.४मनपा व पोलिसांनी दंडात्मकऐवजी फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे. तसेच एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून, दुर्लक्ष झाल्यास मनपाने कारवाई केली पाहिजे. ४कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे़ याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़पोलिसांची गस्त वाढविण्याची गरजएसटी महामंडळाची मोकळी जागा, आनंदनगर डेपो, इमारत, मनपा शाळा क्रमांक १२५ चे मैदान, आर्टिलरी सेंटररोड, मनपा क्रीडांगण व त्यापुढील गाळ्याच्या बाजूला स्वच्छतागृहात झालेला गांजा पिणाऱ्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी नियोजन करून सापळा रचून धिंड काढत कारवाई करणे गरजेचे आहे. छेडछाड, भाईगिरी व धूम स्टाईल दुचाकी चालविणाºयांना खाकीचा हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक