शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. वेतन करार चर्चेची गाडी  पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:07 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या वेतन करारासंदर्भात असलेले मतभेद अजूनही कायम असल्याने एस.टी. कामगार संघटनेने अद्यापही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. गेल्या दोन वर्र्षांपासून या संदर्भातील प्रश्न सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत पूर्णपणे सुटलेला नसल्याने वेतनवाढीची कोंडी कायम आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वेतन करारासंदर्भात असलेले मतभेद अजूनही कायम असल्याने एस.टी. कामगार संघटनेने अद्यापही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. गेल्या दोन वर्र्षांपासून या संदर्भातील प्रश्न सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत पूर्णपणे सुटलेला नसल्याने वेतनवाढीची कोंडी कायम आहे. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी यातून सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी कामगार संघटनेने परिवहन मंत्र्यांना बैठक बोलाविण्याची विनंती केली असून, आर्थिक भाराचा विचार करता तडजोडीचीदेखील तयारी दर्शविली आहे.या संदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जून २०१८ रोजी महामंडळाच्या वर्धापनदिनी २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या वेतन करारासाठी ४८४९ कोटींची घोषणा मंत्र्यांनी केली होती. मात्र सदर रक्कम वाटप करण्यासंदर्भातील नाराजी लक्षात घेता कामगार संघटनेने मूळ वेतन अधिक १९९० रकमेस २.५७ने गुणण्याचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला होता. तथापि त्यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही, त्यामुळे संघटनेकडून स्वाक्षरी करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. दि. ९ जून २०१८ रोजीच्या बैठकीमध्येच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करताना वार्षिक वेतनवाढीचा व घरभाडे भत्त्याचा दराप्रमाणे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसे पत्र संघटनेला प्रशासनाकडून देण्यातही आले होते.कर्मचाºयांची कनिष्ठ वेतनश्रेणीवर तीन वर्षांपेक्षा जास्त व पाच वर्षांपेक्षा कमी सेवा झालेली आहे अशा कर्मचाºयांना चार अतिरिक्त वेतनवाढी देण्यात येतील, असा निर्णयही झाला होता.या दोन्ही निर्णयांमुळे महामंडळावर पडणारा आर्थिक भार हा ४८४९ कोटींमध्येच धरला जाणार असल्यामुळे संघटनेने दि. १५ जून २०१९ रोजी दिलेल्या १९९०च्या प्रस्तावामध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते याची संघटनेला कल्पना असल्यामुळे संघटना वेतनवाढीच्या प्रस्तावावर तडजोड करण्यात तयार असल्याचेही म्हटले आहे. संघटनेने वेतनवाढीच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा बैठक घ्यावी, अशी मागणी संघटनेने परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच वेतन करार होण्यासंदर्भात चर्चा व्हावी, असे संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीstate transportएसटी