नाशिक : सेंट फ्रान्सिस या इंग्रजी माध्यम शाळेच्या तिडके कॉलनी व राणेनगरच्या शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व्यवस्थापनाकडून ‘ओपन हाऊस’करिता निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ज्या पालकांनी फी भरलेली नाही त्यांच्या पाल्यांचे गुण सांगणे तर दूरच त्यांच्या उत्तरपत्रिकादेखील तपासण्यात न आल्याचा आरोप पालकांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वीच पालिका उपआयुक्त दत्तात्रय गोतिसे यांच्या दालनात मुख्याध्यापक व पालकांची बैठक झाली. दरम्यान, गोतिसे यांनी गुणपत्रक राखून ठेवू नये, असे स्पष्ट आदेश शाळा व्यवस्थापनाला दिले होते, असे पत्रकात म्हटले आहे. तरीदेखील या आदेशाकडे काणाडोळा करत शाळेच्या वतीने निकाल राखून ठेवण्यात आला, तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच तपासण्यात न आल्याचे पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मकरंद वाघ यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)
‘सेंट फ्रान्सिस’च्या पालकांमध्ये पुन्हा नाराजी
By admin | Updated: August 23, 2015 23:12 IST