शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीचा  प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:09 IST

सलग पंधरा दिवसांपासून एस. टी. कर्मचाºयांच्या वेतनवाढीच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेत सन्मानजनक तोडगा न निघाल्याने मान्यताप्राप्त संघटनेने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामुळे कामगारदिनी कामगारांना खुशखबर देण्याचे महामंडळाचे मनसुबे उधळले आहेत.

नाशिक : सलग पंधरा दिवसांपासून एस. टी. कर्मचाºयांच्या वेतनवाढीच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेत सन्मानजनक तोडगा न निघाल्याने मान्यताप्राप्त संघटनेने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामुळे कामगारदिनी कामगारांना खुशखबर देण्याचे महामंडळाचे मनसुबे उधळले आहेत.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेतच्या बैठकांमध्ये संघटनेसमवेत झालेल्या बैठकांमध्ये एकमत न झाल्याने चर्चा निष्फळ  ठरली आहे. पगार वाढीबद्दलची महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली. सदर बैठकीत मान्यताप्राप्त संघटना ३१ मार्च १९९६चे मूळवेतन + ३५०० गुणिले २.५७ या प्रस्तावावर ठाम होती. परंतु कामगारांना लवकरात लवकर सन्मानजनक पगारवाढ व्हावी हा उद्देश समोर ठेवून मान्यताप्राप्त संघटनेने आपल्या सूत्रातील रकमेत थोडी फार तडजोड करण्याचे ठरविले व तसा प्रस्तावही दिला. परंतु परिवहनमंत्र्यांनी फक्त भत्ते व सीटीसी वगळता ७५० कोटींच देण्याची तयारी दर्शवली यामध्ये आपले सूत्र बसवण्याचा आग्रह त्यांनी केला. परंतु यामध्ये आयोगाचा २.५७चा प्रस्ताव बसत नाही. तसेच दुसरा प्रस्ताव मूळवेतन गुणिले २.४१ तसेच भत्ते स्वरूपात मूळवेतनात न देता एकूण पगारावर चार हजार, पाच हजार व सहा हजार अशी पगारवाढ असे एकूण दोन प्रस्ताव देण्यात आले. अर्थात चार ते सहा हजार  रुपये वाढीच्या प्रस्तावात फक्त भत्ते स्वरूपात यावर कोणतीही अनुषंगिक वाढ नाही. सदरची वाढ ही फक्त ३१ मार्च २०३०पर्यंतच मर्यादित  राहणार आहे.  प्रशासनाकडून देण्यात आलेल्या दुसरा प्रस्ताव जरी दिसायला बरा वाटत असेल तरी सदर प्रस्तावामुळे पगारवाढ समाधानकारक नसल्याने संघटनेने तो फेटाळून लावला, तर मान्यताप्राप्त संघटनेकडून दिलेला कनिष्ठ कर्मचाºयाबद्दलचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आला असून, कनिष्ठ कामगारांना वेतनवाढी देऊन नवीन कराराचा लाभ देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. अजूनही २.५७च्या प्रस्तावावर संघटनेची चर्चेची तयारी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी