नांदगाव : शहरात आढळलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पातळीने जिल्ह्यातील अन्य ठिकाणी असलेल्या आकड्यांच्या तुलनेत उच्चांक गाठला असून एकट्या नांदगावमध्ये एका दिवसात ३७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर नांदगाव आगारातील पंचेचाळीस वर्षीय वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात असलेल्या स्थितीच्या तुलनेत मार्च महिन्यातील पहिल्या दहा दिवसातच खाली गेलेला आलेख पुन्हा वर जाऊ लागला आहे. प्रशासकीय दृष्ट्या उपाययोजना करताना सपंर्क शोध मोहीम थंडावल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान एका रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना आवाहन करणाऱ्या यंत्रणेने कंटेनमेंट झोन देखील बंद करून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती सुदैवाने नियंत्रणात असली तरी नांदगाव शहरात एकूण ३७ रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तर मनमाड शहरात अकरा रुग्ण पॉझिटीव्ह आढळले तर ग्रामीण भागात पाच रुग्ण आढळले आहेत.
नांदगावमध्ये कोरोनामुळे एसटी वाहकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:23 IST
नांदगाव : शहरात आढळलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पातळीने जिल्ह्यातील अन्य ठिकाणी असलेल्या आकड्यांच्या तुलनेत उच्चांक गाठला असून एकट्या नांदगावमध्ये एका दिवसात ३७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर नांदगाव आगारातील पंचेचाळीस वर्षीय वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नांदगावमध्ये कोरोनामुळे एसटी वाहकाचा मृत्यू
ठळक मुद्देग्रामीण भागात पाच रुग्ण आढळले आहेत.