शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

निवडणुकीतून एसटी कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:55 IST

विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवस वापरण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ६०० बसेसच्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवस वापरण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ६०० बसेसच्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी देण्यात आलेल्या सुविधेसाठी जिल्हा निवडणूक शाखेने एसटीला १ कोटी २९ लाख रुपये अदा केले आहेत. या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या बीएसएनएलच्या वेबकास्टिंग सेवेसाठीदेखील निवडणूक शाखेने कोट्यवधी रुपये अदा केले आहेत.ङङजिल्ह्यातील पंधरा मतदार- संघांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामीण आणि शहरी भागात मतदान केंद्रे असल्यामुळे या केंद्रांवर पोहोचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचा वापर करण्यात आला. शहरातील तीन मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व मतदारसंघ हे ग्रामीण भागात तर इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकसारख्या अतिदुर्गम भागातही अनेक मतदान केंद्रे होती. साडेचार हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रांच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ६०० बसेसचा वापर करण्यात आला.मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी नेहमीप्रमाणेच बसेसचे नियोजन करण्यात आले होते. व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीनची सुरक्षितरीत्या वाहतूक करणे यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज होती. त्यासाठी निवडणूक शाखेने अडीच हजार छोटी-मोठी वाहने भाड्याने घेतली होती. त्यात एसटी महामंडळाच्या ६०० बसेसचा समावेश होता. जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात दळणवळण सुविधेअभावी मतदान साहित्याची वाहतूक करणे अवघड होते. त्यामुळे एसटीची मदत घेण्यात आली होती. कोणत्याही निवडणुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य दिले जाते. गाव खेड्यापर्यंत असलेले जाळे आणि सुरक्षितता यामुळे एसटीला प्रथम पसंती दिली जाते.वेबकास्टिंगसाठी बीएसएनएलही मालमाालमतदारकेंद्रांवरील हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी संपर्क साधनांची कनेक्टिव्हिटी नाही अशा ठिकाणी बीएसएनलच्या वेबकास्टिंग सुविधेचा वापर करण्यात आला. त्यामुळे मतदान केंद्रांवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. त्यातून काही गैरप्रकारांना आळा घालणेदेखील शक्य झाले होते. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ४ हजार ५७९ मतदान केंदे्र होती. त्यापैकी ४५७ मतदान केंद्रांचे बीएसएनएल नेटवर्कच्या माध्यमातून वेबकास्टिंग करण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आला होता. मतदान यंत्रे वाहतूक वाहनांना जीपीएस यंत्रणेद्वारे वॉच ठेवण्यात आला. या सेवेसाठी बीएसएनएल कंपनीला नाशिक कार्यालयास १ कोटी ३८ लाख रु पयांचे देयक अदा करण्यात आले.महामंडळाकडून घेण्यात आलेल्या बसेसच्या सेवेपोटी एसटीला १ कोटी २९ लाख रु पयांचे देयक जिल्हा प्रशासनाने दिले आहे. सदर देयक अदा करण्यात आले असून, महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली आहे.लोकसभा निवडणुकीतही महामंडळाला कोट्यवधी रुपये मिळाले होते. निवडणुकीच्या माध्यमातून महामंडळाच्या उत्पन्नाला हातभार लागत आहे. बसेसचा तुवटडा होऊ नये यासाठी अतिरिक्त बसेस तैनात होत्या.

टॅग्स :Electionनिवडणूकstate transportएसटी