शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येवला येथे  श्रीमद्भागवत कथा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:42 IST

मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता. येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले.

पाटोदा : मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता. येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले.  यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भरत राजाने खूप तपश्चर्या केली परंतु शेवटी हरिणाचे पिलू पाळले, त्या हरिणाची खूप आसक्ती झाली. शेवटी हरीण हरीण म्हणून प्राण सोडला. त्यांना पुढील जन्म हरिणाचा मिळाला म्हणून प्राण्यावर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, असे महाराजांनी समजावले. महाराजांनी कपिल देवहुती संवाद, ध्रुव चरित्र, जडभरत रहु गण संवाद, अजामिल व्याख्यान, प्रल्हाद चरित्र, दक्षप्रजापती चरित्र आदी प्रसंग कथन केले. कथेप्रसंगी संगीत भजने होत असल्याने भाविक तल्लीन होऊन भजने गाऊन नाचतात.  कार्यक्रमास अंबादास महाराज जगताप, निवृत्ती महाराज चव्हाण, शिवाजी महाराज गायके, वाल्मीक महाराज कदम, नारायण महाराज काळे, अमृता शिंदे, सरपंच रघुनाथ शिंदे, उपसरपंच नारायण गुंजाळ, कृष्णा गरूडे, आनंदा शिंदे, शिवाजी महाले, रावसाहेब बढे, पांडुरंग गायके आदी मान्यवर व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्र मासाठी संगीत विशारद हरिभाऊ महाराज टेकाडे, सिंथेसाइजर मदन महाराज नखाते, आॅर्गनायझर रमेश महाराज बिटे, तबलावादक सुनील महाराज ढेंगळे आदींची सुरेख साथ संगत लाभली असल्याने कार्यक्रमास उत्तरोत्तर रंग भरत आहे. शेवटी ग्रंथाची आरती यजमान नवनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन कथेचा समारोप करण्यात येतो.

टॅग्स :Nashikनाशिक