टीईटीसाठी सहायक परिरक्षकांचे बैठे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:25 PM2020-01-15T23:25:34+5:302020-01-16T00:30:51+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.१९) होणार असून, या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सहायक परिरक्षक बैठे पथक म्हणून भूमिका बजावणार असून, अशाप्रकारे बैठे पथकाची भूमिका बजावण्यासाठी पेपर एकसाठी ३४ व पेपर दोनसाठी २७ असे एकूण ६१ परिरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

A squad of assistant guards for the TET | टीईटीसाठी सहायक परिरक्षकांचे बैठे पथक

टीईटीसाठी सहायक परिरक्षकांचे बैठे पथक

Next
ठळक मुद्दे६१ केंद्रांवर परीक्षा : नियोजन बैठकीत गोपनीयतेसंदर्भात प्रशिक्षण

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.१९) होणार असून, या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सहायक परिरक्षक बैठे पथक म्हणून भूमिका बजावणार असून, अशाप्रकारे बैठे पथकाची भूमिका बजावण्यासाठी पेपर एकसाठी ३४ व पेपर दोनसाठी २७ असे एकूण ६१ परिरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची प्रशिक्षण सभा व पूर्वतयारी जिल्हा स्तर आढावा बैठक मंगळवारी (दि.१४) मविप्रच्या गंगापूररोड परिसरातील सीएससीएस महाविद्यालयात घेण्यात आली. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फ त निश्चत क रण्यात आलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र परीक्षार्थींची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ६१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून, ३४ केंद्रांवर पेपर एकसाठी १२ हजार ६७९ तर पेपर दोनसाठी १० हजार १२९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत.
परीक्षेदरम्यान, पर्यवेक्षक सर्वेक्षक व परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात मोबाइलबंदी करण्याच्या सूचना उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणे यांनी केल्या. शिक्षक पात्रता परीक्षेचे जिल्हा परिरक्षक उपशिक्षणाधिकारी बी. टी. चव्हाण व विस्ताराधिकारी चंद्रकांत गवळी परीक्षेशी संबंधित गोपनीय साहित्य, परीक्षेपूर्वी परीक्षेच्या दिवशी व परीक्षा झाल्यानंतर केंद्र्र संचालक यांनी करावयाची कामे व जबाबदाºया, कर्तव्य याबाबत संगणकीय सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग मुख्यालयातील विस्तार अधिकारी संतोष झोले यांनी प्रास्ताविक केले. नीलेश पाटोळे यांनी आभार मानले.

दक्षता घेण्याच्या सूचना
परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात ९ झोनल अधिकारी, ६१ सहायक परिरक्षक व ६१ केंद्र संचालक यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील झोनल आॅफिसर व सहायक परिरक्षक यांच्या नियुक्ती सोडत पद्धतीने जबाबदाºया सोपविण्यात आल्या असून परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय दक्षतेने काम करताना प्रश्नपत्रिका, परीक्षाविषयक सर्व साहित्याची गोपनीयता राखण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी केल्या.

Web Title: A squad of assistant guards for the TET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.