शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनळने केली स्वखर्चाने फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:35 IST

चांदवड येथे कोरोनाचा विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक जागृत झाले आहेत. आॅलिंपिक रद्द झाल्यामुळे भारतीय रोइंग खेळाडू दत्तू भोकनळ सध्या आपल्या मूळ गावी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे आले आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून दत्तू भोकनळ यांनी स्वखर्चाने गावात ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी औषध फवारणी केली.

ठळक मुद्देतळेगाव रोही : आश्रमातील मुलांना अन्नधान्यासह किराणाची मदत

दरेगाव : चांदवड येथे कोरोनाचा विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक जागृत झाले आहेत. आॅलिंपिक रद्द झाल्यामुळे भारतीय रोइंग खेळाडू दत्तू भोकनळ सध्या आपल्या मूळ गावी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे आले आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून दत्तू भोकनळ यांनी स्वखर्चाने गावात ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी औषध फवारणी केली.संपूर्ण गावाने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करून गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, तसेच गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोनाला हरवण्यासाठी कंबर कसली आहे कोरोनाची लागण झालेल्या रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि त्यांना लागणारे साहित्य हे खेड्यापाड्यापर्यंत वेळेत पोहोचेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये व आपण आहे त्या स्थितीत व्यवस्थित राहावे यामुळे दत्तू भोकनळ यांनी लासलगाव येथील शास्त्रीनगर पिंपळगाव (नजीक) येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील मुलांना बिस्किट, किराणा सामनही दिले. याप्रसंगी बाळासाहेब भोकनळ, युवराज भोकनळ, भागवत झाल्टे हे उपस्थित होते.तळेगावरोही गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली तर गावातील नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे व आपल्या घरात रहा, सुरक्षित रहा, कोरोनासोबतच इतर कोणतीही रोगराई गावात फिरकू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही दत्तु भोकनळ यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य