शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नित्यानंद शाळेत क्रीडामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:55 IST

घोटी येथील नित्यानंद इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात झाला.

घोटी : येथील नित्यानंद इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात झाला. महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन नंदकुमार शिंगवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक किशोर बुंदेले व मुख्याध्यापक इंदिरा प्रसाद यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून क्रीडामहोत्सवाची सुरुवात करण्यात आली.लहान गटातील चिमुकल्यांनी तारे जमीन पर या गीताने तसेच दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अ‍ॅरोबिक ड्रिल डान्स, तिसरीच्या विद्यार्थ्यांनी काठीड्रिल अशा विविधरंगी नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर १०० मीटर रनिंग, नॉव्हेल्टी रेस, रिले, लेजीम नृत्य, विविध प्रकारच्या आकृत्या करून यामधील स्टार, स्वस्तिक, कमळफूल, २०२० नववर्षाच्या स्वागतपर आकर्षक कलाकृतीने सर्वांची मने जिंकली तसेच टाळ्यादेखील मिळविल्या. याप्रसंगी मैदानी खेळांबरोबरच कराटेमधील वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.क्रीडामहोत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान सोहळा झाला. कॅरम, बुद्धिबळ, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, कबड्डी, व्हॉलीबॉल क्रिकेट, डॉज बॉल, रनिंग अशा विविध प्रकारांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक प.पू. चेतन महाराज, शाळेचे चेअरमन नंदकुमार शिंगवी, व्यवस्थापक किशोर बुंदेले, मुख्याध्यापक इंदिरा प्रसाद, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण