शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 23:13 IST

मालेगाव : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यानिमित्त क्रीडा भारती, आयुष मंत्रालय, पतंजली योग विद्यापीठ, गीता परिवार, नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशन हार्ट फुलनेस अशा ६ अखिल भारतीय सामाजिक व क्रीडा संघटना यांच्यामार्फत संपूर्ण भारतात ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात विविध सामाजिक व क्रीडा संघटनांनी एकत्रित येत सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देमालेगाव : विविध सामाजिक, क्रीडा संस्थांचा सहभाग

मालेगाव : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यानिमित्त क्रीडा भारती, आयुष मंत्रालय, पतंजली योग विद्यापीठ, गीता परिवार, नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशन हार्ट फुलनेस अशा ६ अखिल भारतीय सामाजिक व क्रीडा संघटना यांच्यामार्फत संपूर्ण भारतात ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात विविध सामाजिक व क्रीडा संघटनांनी एकत्रित येत सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले होते.तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये योगा व सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी, तसेच पारंपरिक शास्त्रोक्त व्यायाम प्रकार व सूर्यनमस्काराचा प्रसार व्हावा, यासाठी साठ फुटी रस्त्यावरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले जाते. प्रारंभी गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शक्तीचे दैवत श्री बजरंग बली यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तुकाराम मांडवडे यांनी ह्यखेल खिलाडी खेलह्ण हे सामूहिक गीत सादर केले. क्रीडा भारतीचे जिल्हामंत्री गीतेश बाविस्कर यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. शहर संयोजक भाग्येश कासार यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सहभागी संघटनांच्या प्रमुख व प्रतिनिधींना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मालेगाव शहराध्यक्ष चेतन वाघ यांनी आभार मानले.क्रीडा प्रकार आत्मसात करा : पोफळेअभिजीत जाधव व स्वाती मराठे यांनी आलेल्या विद्यार्थी व खेळाडूंकडून सामूहिक सूर्यनमस्कार करून घेतले. आरोग्य व मनस्वास्थ्य ठेवण्यासाठी क्रीडांगणावर जास्तीतजास्त वेळ देऊन विविध पारंपरिक क्रीडा प्रकार आत्मसात करून, नवीन पिढी घडविण्यात योगदान दिले पाहिजे, असे आवाहन क्रीडा भारतीचे प्रांत उपाध्यक्ष नितीन पोफळे यांनी केले. क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष भानू कुलकर्णी यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद केले.

टॅग्स :MalegaonमालेगांवStudentविद्यार्थी