शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

 आमदार चषक कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; दंगल : सिन्नरच्या स्पर्धेत ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपटूंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:16 IST

सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर सुरू असलेल्या क्रीडामहोत्सवांतर्गत बुधवारी ६१व्या आमदार कुस्ती चषक स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला. जिल्हाभरातील ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपट्टूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध गटात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना भूगाव (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देक्रीडामहोत्सवांतर्गत बुधवारी ६१व्या आमदार कुस्ती चषक स्पर्धा सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ

सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर सुरू असलेल्या क्रीडामहोत्सवांतर्गत बुधवारी ६१व्या आमदार कुस्ती चषक स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला. जिल्हाभरातील ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपट्टूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध गटात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना भूगाव (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाल्यानंतर बुधवारी सकाळी आमदार चषक कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला. येथील वंजारी समाज मैदानावर होत असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक शैलेश नाईक, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड यांच्यासह पंचायत समिती, नगरपालिका व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.कुमार गट मुले (मॅट), महिला (मॅट), महाराष्टÑ केसरी चाचणी मुले (मॅट) व महाराष्टÑ केसरी चाचणी मुले (माती) अशा चार गटात या स्पर्धा पार पडल्या. ४२ किलो वजनापासून ते ११० किलो वजनापर्यंतच्या गटात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक विभागाचे १० गट करण्यात आले होते. महिला गटात ४५ ते ६६ किलो वजन गटात महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या. महाराष्टÑ केसरी चाचणी स्पर्धेत ५७ ते १३० किलो वजनी गटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हाभरातील क्रीडाप्रेमींनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. कुस्तीपट्टूंचे डाव-प्रतिडाव पाहून क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले. कुस्ती स्पर्धेसाठी दोन मैदान करण्यात आले होते. एका मैदानावर माती, तर दुसरे मैदान मॅटसाठी होते. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे कुस्तीपट्टूंमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता.कुस्ती स्पर्धा यशस्वीतेसाठी उदय सांगळे यांच्यासह नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ बलकवडे, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, उत्तम दळवी, विशाल बलकवडे यांनी नियोजन केले होते. पंच म्हणून ज्ञानेश्वर शिंदे, विशाल बलकवडे, तेजस बलकवडे, अरविंद गवळी, रामचंद्र पालवे, गणपत चुंभळे, संपत गोवर्धने यांनी काम पाहिले.राज्य व राष्टÑीय पातळीवरील कुस्तीपट्टूंचा सहभागयेथील वंजारी समाज मैदानावर अतिशय नियोजनबद्ध आमदार चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ३५ राज्य पातळीवरील तर १५ राष्टÑीय पातळीवरील कुस्तीपट्टूंनी सहभाग घेऊन आमदार चषक स्पर्धेची शान वाढवली.