शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

तळपत्या उन्हात भक्तीचा महापूर

By admin | Updated: April 19, 2016 00:46 IST

मालेगाव : ‘जय अंबे’चा जयघोष करीत भक्तांची सप्तशृंगगडाकडे कूच

 किशोर इंदोरकर  मालेगाव कॅम्पआदिमाता, आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगगडावर लाखो भाविक चैत्रोत्सवानिमित्त मार्गस्थ होत आहे. धुळे, जळगाव, शिरपूर या खान्देश पट्ट्यातून येणाऱ्या भक्तांमुळे कसमादे परिसर व मालेगावचे मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.प्रतिवर्षाप्रमाणे चैत्रोत्सवानिमित्त लाखो भक्त गडावर देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातमधूनदेखील भाविक दर्शनासाठी येतात. यातील खान्देश पट्ट्यातील हजारो भाविक थेट पायी गडावर दाखल होतात. विशेषत: अष्टमी वा रामनवमीपासून शहरातून धुळे, झोडगे, दरेगाव, जुना आग्रारोड सटाणारोड, दाभाडी या प्रमुख रस्त्यांवर भाविकांचे जथ्थे सर्व मूलभूत तयारीनिशी सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करत आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगावपासून गडाकडे जाणारा हा रस्ता भाविकांना सुकर पडतो. मालेगावी सध्या उन्हाचा पारा ४४.८ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला असून, भाविकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही डोक्यावर सर्व सामानांचे ओझे, हातात भगवा झेंडा धरून ‘सप्तशृंगीमाते की जय’च्या घोषणा देत उत्साहाने भाविक मार्गक्रमण करताना शहरातून दिसत आहे.पूर्व भागातून शहरात प्रवेश करणाऱ्या भाविकांसाठी दरेगाव, देवीचा मळा या भागात सामाजिक संस्थांनी नास्ता व जेवणाची सोय केली आहे, तर आरामाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. नवीन बसस्थानक, पांजरापोळ व्यापारी संकुल येथे शीतपेये व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. शिवाजी पुतळा परिसरात विधायक मंडळातर्फे अल्पोपाहार व शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोसमपूल भागात रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे अल्पोपाहार व विश्रांतीची सोय केली आहे. सटाणा रस्त्यावर भाविकांसाठी अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी व शीतपेय, टरबूज, ताक, चॉकलेटचे वाटप सेवाभावी संस्था करीत असल्याचे दिसत आहे. येथील रस्त्यावर जाजू कंपाउंडलगत मालेगाव केमिस्ट असोसिएशन व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे मोफत औषधोपचार केले जात आहे. भाविकांना सर्व त्रासांवर विशेषत: पायाला फोडे येणे, बारीक ताप, अंगदुखी, पोटरीचे दुखणे आदिंवर त्वरित उपचार करून दिले आहे. केंद्रावर भक्तांची एकच गर्दी उसळली आहे. या पाठोपाठ ओआरएस पावडर, शक्तिवर्धक सिरप असे गुणकारी औषधे दिली जात आहेत. यापुढे याच रस्त्यावर सटाणानाका चौक, टेहरे चौफुली येथेही काही सुविधा पुरवण्यात येत आहेत. तर मधुबन हॉटेलजवळ मालेगाव येथील पवार कुटुंबीयांतर्फे ७ टन खजूरचे वाटप करण्यात येत आहे. अनेक वर्षापासून पवार कुटुंबीयातर्फे खारीक, खजूर सारखे उपयुक्त पदार्थ भाविकांना देण्यात येत आहे.शहरातून सटाणारोड ते दाभाडी पुढे जाणाऱ्या या रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी उसळते. दरम्यान, या प्रमुख मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबत असल्याने पोलिसांना येथील वाहतूक सुरळीत करताना कसरत करावी लागते. यातून अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहतात. भर उन्हात पायी प्रवास करणारे हे भाविक शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. येत्या दोन दिवसात पायी गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. उन्हामुळे लहान मुलांचे हाल होत आहे.