देशमाने : येथील ग्रामपंचायतच्या वतीने शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच प्रमोद दुघड यांच्या हस्ते स्वराज्य ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिवराज्याभिषेक व शिवरायांच्या चरित्रावर सुभाष जगताप, लहानुबाई जगताप, मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, ग्रामसेवक देवचंद शिंदे यांची भाषणे झाली. स्वराज्य गीताने शिवरायांना मानवंदना देण्यात आली. सूत्रसंचालन नितीन शिंदे, कुणाल तळेकर यांनी केले.कार्यक्रमास माजी सरपंच प्रभाकर जगताप, उपसरपंच यशवंत जगताप, ग्राम पंचायत सदस्य सरला जगताप, सोनाली गोरे, आण्णा पवार, बापू काळे, ग्राम विकास अधिकारी अंबादास साळुंखे, गणपती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गणेश दुघड, शरद गोरे, ग्राम पंचायत कर्मचारी अर्जुन पवार, बबन पवार, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
देशमानेत शिवस्वराज्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 00:58 IST
देशमाने : येथील ग्रामपंचायतच्या वतीने शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
देशमानेत शिवस्वराज्य दिन उत्साहात
ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन