ननाशी : ननाशीसह परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच दत्ता शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत ध्वजारोहण ग्रा.पं. सदस्य पंढरीनाथ वाघमारे यांनी केले. जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रा .पं सदस्त दत्ता गांगोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ग्रा. पं. सदस्य ताराबाई चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस औट पोस्ट, वनपरिक्षेत्र कार्यालय, तलाठी कार्यालय, प्रा. आ. केंद्र, वीज उपकेंद्र,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच परिसरातील शाळा, सरकारी कार्यालय आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ननाशीत प्रजासत्ताक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:55 IST
ननाशी : ननाशीसह परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ननाशीत प्रजासत्ताक उत्साहात
ठळक मुद्देजिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत ध्वजारोहण