शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मानोरी, देशमाने परिसरात पेरण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:16 IST

देशमाने : गाव, परिसरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे, मात्र निम्म्याहून अधिक शिवारात अत्यल्प पावसामुळे पेरणीयोग्य ओल नसल्याने त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत.

देशमाने : गाव, परिसरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे, मात्र निम्म्याहून अधिक शिवारात अत्यल्प पावसामुळे पेरणीयोग्य ओल नसल्याने त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत.गावच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागात खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांच्या पेरणीस वेग आला आहे. गावाकडील पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने अद्याप पेरणीयोग्य ओलच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली आहे.तुरळक शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या अपेक्षेने पेरण्या केल्या. आगामी दोन-तीन दिवसांत पुरेसा पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट या शेतकºयांपुढे उभे राहिले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सभोवताल समाधानकारक पाऊस होत असून, या भागातच पाऊस हुलकावणी देत आहे. दरम्यान, देशमाने शिवारातील खडकी नाला ते जळगाव नेऊर शिवारातील वनारसी नाला यादरम्यान नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असल्याचे या परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे.-----------------------------------मानोरी बुद्रुक परिसरात मृग नक्षत्रात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील मका, सोयाबीन पेरण्यांना सोमवारी वेग आला असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या धास्तीने शेतकरी वर्गाने पाऊस पडल्यानंतर शेतकामांच्या मशागतीला सुरुवात केली होती.लॉकडाऊनच्या परिस्थितीत काही शेतकºयांनी समूह पद्धतीने बियाणे आणि खते आपल्या बांधावर पेरणीसाठी खरेदी केले असल्याचे दिसून आले आहे. पारंपरिक पद्धतीने यंदाही काही ठिकाणी शेतकरी बैलजोडीच्या पेरणीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. शेतीची जास्त तुडवातुडव होऊ नये यासाठी बैलजोडीचा वापर शेतकरी करीत आहेत.---------------------कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असल्याने यंदा मजुरांची मोठी वानवा भासत असल्याचे दिसून येत आहे. सध्या मानोरी परिसरात छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करण्यास शेतकरी पसंती देत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक