शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आयमा निवडणुकीच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:12 IST

अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येत असून, नव्या पदाधिकायांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले असल्याने आता विरोधी पॅनलकडूनही व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

सिडको : अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येत असून, नव्या पदाधिकायांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले असल्याने आता विरोधी पॅनलकडूनही व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.  आयमा या संघटनेत सुमारे पंधराशे उद्योजक सहभागी झाले असून, दर दोन वर्षांनी करण्यात येते. मागील अनेक वर्षे ही निवडणूक सर्वसंमतीने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने बिनविरोध करण्याची परंपरा असली तरी यंदा मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी वाटत आहे. सध्याचे विद्यमान अध्यक्ष असलेले राजेंद्र अहिरे यांच्या वेळी निवडणूक प्रक्रिया होण्याची वेळ आली होती, परंतु यातही आयमामधील वरिष्ठांनी केलेल्या तडजोडीनंतर ही निवडणूक बिनविरोध पार पडली. आता पुन्हा मे २०१८ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलने सध्याचे उपाध्यक्ष असलेले वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार नुकतेच घोषित केले आहे. आयमाच्या दुसºया गटाचे उमेदवार असलेले तुषार चव्हाण यांना वरिष्ठांनी दोन वर्षांपूर्वी राजेंद्र अहिरे अध्यक्ष केल्यानंतर पुढील म्हणजे २०१८च्या निवडणुकीत अध्यक्ष करण्याचा शब्द आयमाच्या माजी पदाधिकाºयांनी दिला होता. परंतु असे असतानाही सत्ताधारी पॅनलने आधीच वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केल्याने दुसºया गटाच्या पॅनलमध्ये नाराजीचा सूर पसरला असल्याचे दिसून येत आहे. दुसºया गटाच्या पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार तुषार चव्हाण हे येत्या सोमवारी बैठक घेणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक