शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा दरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:16 IST

माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला.

नाशिक : माता आणि माती, आजोबा आणि नात यांच्यातील नात्यांचा उलगडा करणाºया, निसर्गाच्या सुंदरतेची प्रचिती देणाºया कवितांची सायंकाळ नाशिककरांनी शुक्रवारी (दि. २) अनुभवली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावातीलच भूमिपुत्रांच्या शब्दगंधाचा हा दरवळ मैफलीनंतरही नाशिककरांच्या मनात घोळत राहिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी किशोर पाठक, खलील मोमीन, लक्ष्मण महाडिक, रेखा भांडारे, गंगाधर अहिरे, तुकाराम धांडे हे सहभागी झाले होते. मैफलीची सुरुवात तुकाराम धांडे यांनी केली आणि ‘आई होती तेव्हा, जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना उड्या मारायचं’ ही माती आणि मातेचे नाते विशद करणारी कविता सादर केली. या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली आणि ‘वन्स मोअर’ घेत धांडे यांनी पुन्हा एकदा कविता ऐकविली. त्यानंतर लक्ष्मण महाडिक यांनीही आजी आणि नातीचा संवाद साधणारी कविता सादर केली. ‘पहिला पाऊस झेलशील जेव्हा, चिंब पावसात भिजून घे’ या कवितेला उपस्थितांकडून दाद मिळाली. रेखा भांडारे यांनी ‘शल्य’ ही कविता सादर करताना सिग्नलवर गजरे विकणाºया चिमुरड्यांच्या वेदनांना हात घातला. ‘गिधाडे’ या कवितेतून ‘आतले ते माणसांचे, रंग होते वेगळे, सभ्यतेच्या आड त्यांचे, रूप ते झाकले’ असे सांगत माणसातल्या विकृतींवरही त्यांनी प्रहार केले. गंगाधर अहिरे यांनी ‘कळप’ या कवितेतून समाजातील भीषण वास्तव मांडले. ‘आला कळप कळप, त्याने घातली झडप, जीव कोवळा कोवळा, रक्ताळलेला सरे आम’ या काव्यपंक्तीने उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले. अहिरे यांनी राजकारणी आणि चोर यातील साम्यता दर्शविणारी कविता सादर करत मैफलीचा माहोल हलका-फुलका केला. खलील मोमीन यांनी ‘अनुनय’ आणि ‘पुनर्विवाह’ या कविता सादर करत दाद मिळविली. मैफलीचे निवेदन किशोर पाठक यांनी केले. प्रारंभी प्रतिष्ठानचे विलास लोणारी आणि अरविंद ओढेकर यांनी कवींचे स्वागत केले.रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादकुसुमाग्रज स्मरण उपक्रमांतर्गत स्थानिक कवींच्या मैफलीला नाशिककर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इगतपुरीचे कवी तुकाराम धांडे यांनी सादर केलेल्या पहिल्याच कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला आणि धांडे यांनीही रसिकांची निराशा न करता पुन्हा एकदा कविता ऐकविली.

टॅग्स :Nashikनाशिक