शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी करारासाठी पुन्हा विशेष आॅनलाइन महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:08 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २९) पहिल्या आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी त्यासाठी अत्यंत मर्यादित कालावधी होता. त्यामुळे केवळ अंदाजपत्रकीय सभाच होऊ शकली. त्यामुळे आता गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या जलसंपदा विभागाच्या पाणी करारासंदर्भात नव्याने विशेष महासभा घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. तसे सुतोवाच महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २९) पहिल्या आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी त्यासाठी अत्यंत मर्यादित कालावधी होता. त्यामुळे केवळ अंदाजपत्रकीय सभाच होऊ शकली. त्यामुळे आता गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या जलसंपदा विभागाच्या पाणी करारासंदर्भात नव्याने विशेष महासभा घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. तसे सुतोवाच महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी जलसंपदा विभागाशी वार्षिक करार करणे आवश्यक असते. गेल्या आठ वर्षांपासून अशाप्रकारचा करारच झालेला नाही. जलसंपदा विभागाने दीडशे कोटी रुपयांची केलेली मागणी नंतर कमी केली असली तरी अनेक प्रकारच्या मागणीबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागात मतभेद आहेत. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वादावर शासकीय स्तरावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगून करार करण्याचे निर्देश नाशिक येथेचे एका बैठकीत दिले असले तरी त्यानंतर महासभेत विविध कारणांनी पाचवेळा कराराचा मसुदा संमत करण्याचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला आहे. यंदा महापौरांनी दोन सभा आॅनलाइन घेण्याची तयारी केली होती. मात्र, ते शक्य झाले नाही त्यामुळे पाणी कराराचा प्रस्ताव पाचव्यांदा तहकूब झाला आहे. आता या विषयासाठी स्वतंत्र महासभा सात ते आठ दिवसांत बोलविण्यात येईल, असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.----------------------------४ आॅनलाइन महासभेच्या तांत्रिक मर्यादेमुळे महापालिकेच्या वतीने सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे, गेल्या सिंहस्थातील १७ कोटी रुपयांच्या ज्यादा खर्चाला मान्यता देणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती देणे, वृक्षगणनेसाठी चार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च, शहर अभियंत्यासह अन्य अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती आदी विषय तहकूब करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक