शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माहेश्वरी सभेतर्फे विशिष्ट व्यक्ती मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:33 IST

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने नवीन आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरात शनिवारी (दि.१३) शहरात विशिष्ट व्यक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

पंचवटी : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने नवीन आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरात शनिवारी (दि.१३) शहरात विशिष्ट व्यक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.श्रीमती के. एन. केलानगर येथे संपन्न झालेल्या विशिष्ट व्यक्ती मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष कल्पना गगराणी, आमदार जयप्रकाश मुंदडा, सुरेश काकाणी, संघटन मंत्री अजय काबरा, सतीश सोनी, अशोक बंग, सतीश चरखा आदींसह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सभापती श्यामसुंदर सोनी होते. शनिवारी सकाळी विवाह समस्या चिंतन, मन की बात आणि त्यानंतर दुपारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. रात्री समुपदेशन कार्यक्र म झाला. यावेळी सोनी, शैलेश मालू, शोभादेवी सोमाणी,संजय दहाड, प्रा. गगराणी आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी श्रीनिवास मुंदडा, रवींद्र आगीवाल, राजेंद्र मुंदडा, लीलाधर राठी, विजय केला, केदार मालपाणी, कल्पेश हेडा, हिरालाल डागा, रामेश्वर सोनी, नवनीत तापडिया, गुणवंत मणियार, गोकुळ तापडिया आदींसह मान्यवर तसेच समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष जाजू यांनी केले.पहिलाच कार्यक्रममाहेश्वरी समाजाच्या भवितव्यासाठी विशिष्ट परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. समाजात विधवा, विधुर व घटस्फोटितांच्या भवितव्यासाठी अखिल भारतीय स्तरावर माहेश्वरी समाजाचा पहिला कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला होता. याशिवाय समाजातील ज्या युवक-युवतींचा विवाह झालेला नाही त्यांचादेखील परिचय संपन्न झाला. समाजातील काही विधवा, विधुर व घटस्फोटित असलेल्यांचे पुढील आयुष्य व्यवस्थित जावे यासाठीच मेळाव्याचे आयोजन केल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम