शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारूविक्री परवान्यासाठीची विशेष सभा उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:22 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ग्रामपंचायत हद्दीत दिवसाढवळ्या देशी विदेशी दारू विक्र ी परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ठराव करण्यासाठी चक्क रात्री बोलावलेल्या ग्रामसभेकडे महिला सदस्यांनी व गावातील महिलांनी पाठ फिरवल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर आली. त्यामुळे अंधारात करण्याचा ठराव पूर्वनियोजित डाव उधळला गेला.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ग्रामपंचायत हद्दीत दिवसाढवळ्या देशी विदेशी दारू विक्र ी परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ठराव करण्यासाठी चक्क रात्री बोलावलेल्या ग्रामसभेकडे महिला सदस्यांनी व गावातील महिलांनी पाठ फिरवल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर आली. त्यामुळे अंधारात करण्याचा ठराव पूर्वनियोजित डाव उधळला गेला. चिंचखेड गावच्या हद्द लागत पिंपळ गाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार असून या ठिकाणी दिंडोरी व निफाड,चांदवड,कळवण,या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी टोमॅटो व कांदा विक्र ीसाठी घेऊन येतात. त्यामुळे या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांची मोठी रेलचेल आहे. यापैकी काही हॉटेल व्यावसायिकांनी चिंचखेड ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी व ग्रामसेवकांना हाताशी धरून यापूर्वी कागदोपत्री ग्रामसभा दर्शवून ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दारूविक्र ी परवाना मिळवणसाठी प्रस्ताव सादर केले. या प्रकारची ग्रामस्थांना चाहूल लागल्यामुळे मंगळवारी सकाळी पुन्हा नव्याने ग्रामसभा आयोजित करून यासंदर्भात नव्याने ठराव करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु या सभेत गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा असलेला विरोध लक्षात घेवून ग्रामसेवक तांबे यांनी तत्काळ रात्री ८.३० वा महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचं फतवा काढून तशी सूचना वार्ता फलकावर लिहून टाकली. ही महिला ग्रामसभा असल्याने पुरु षांनी या सभेसाठी हजर राहू नये ही खास टीप या सूचना फलकावर लिहिण्यात आली हे विशेष. दिवसभर शेतात मोलमजुरी करणाºया महिला कुठलीही पूर्वसूचना न देता आयोजित महिला ग्रामसभेला कशा उपस्थित राहणार हा साधा प्रश्न ग्रामसेवक व पदाधिकाºयांना पडू नये हे विशेष मानावे लागेल. आठवड्यातून ठराविक दिवस ग्रामपंचायतीत उपस्थित राहणारे ग्रामविकास अधिकारी व पंचायत समितीने निरीक्षक म्हणून पाठविलेले विस्तार अधिकारी, सरपंच संजय पंढारे यांच्यासह वणी पोलिस स्टेशनचे अधिकारी मोठ्या फौजफट्यासह या यावेळी हजर होते मात्र उपसरपंच उषा मेधने यांच्यासह इतर महिला सदस्यांनी व गावातील महिलांनी या सभेकडे पाठ फिरवल्यामुळे ही सभा तहकूब करण्याची नामुष्की ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर आली.-------------------------------पंचायत समितीने महिला ग्रामसभा असल्यामुळे प्रत्यक्षात सभा झाली किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी निरीक्षक म्हणून माझी नेमणूक केली आहे. याबाबत ही सभा तहकूब करण्यात आली असून त्यासंदर्भात वस्तुस्थिती निष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.-पी. एस.पाटील, विस्तार अधिकारी-------------------------ग्रामविकास साधण्यासाठी महत्वाच्या विषयावर अर्ध्या रात्री ग्रामसभा बोलावली असती तर आनंद झाला असता मात्र केवळ महिला उपस्थित राहू नये व दारूविक्र ी परवान्यासाठी आवश्यक ठराव करण्यासाठी विरोध होऊ नये यासाठी अंधारात सभा घेण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.-शिवानंद संधान, ग्रामस्थ, चिंचखेड