शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

विशेष पोलीस महानिरीक्षकांची मालेगावी भेट

By admin | Updated: April 7, 2016 23:56 IST

विनय चौबे : कायदा, सुव्यवस्थेसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा

आझादनगर : मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात जनतेचा सहभाग अत्यावश्यक असून, अनेक कटु प्रसंगातही शहर पोलीस दल व जनता यांच्यातील समन्वयातूनच अनेक वर्षांपासून शहरात शांतता नांदत आहे. म्हणून येथील नागरिकांचे योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी काढले.आज दुपारी १२ वाजेदरम्यान त्यांनी मालेगावी भेट दिली. अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा केली. ते म्हणाले, जेथे नागरिक तेथे समस्या राहणारच; परंतु मालेगाव पोलीस दलातर्फे सर्वच विभागाच्या समस्या सोडविण्यात येतात. म्हणूनच येथे रस्त्यावरील अतिक्रमण असो की सायजिंगचे प्रदूषण सर्व तक्रारी पोलिसांकडे येतात. यातून शहरवासीयांचा पोलिसांवरील असलेला विश्वास सिद्ध होतो. परंतु एखादा शुल्लक मुद्दा संपूर्ण शहरावर लादला असता त्यावर चर्चेतून तोडगा काढावा असा सल्लाही काही तक्रार करणाऱ्यांना दिला. यावेळी शहराच्या सद्यस्थितीची माहिती उपस्थितांकडून जाणून घेतली. तेव्हा लोकायुक्तांकडून आलेल्या आदेशान्वये करण्यात आलेल्या कारवाई, सायजिंगद्वारे होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी याबाबत तक्रार करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक गजानन राजमाने, माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे, नगरसेवक संजय दुसाने, सुफी गुलाब रसूल, युसुफ इलियास, केवळ हिरे, पप्पू पाटील, हबीबमियाजी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)