शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एड्स जनजागृतीसाठी भिंती केल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:28 IST

एचआयव्ही एड्स या दुर्धर आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्त्रीय व मूलभूत माहितीची जाणीवजागृती व्हावी या उद्देशाने शासकीय अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने परिसरातील भिंती बोलक्या करीत फलक लेखनासह विविध उपक्रम राबविले आहे. राष्ट्रीय युवादिन पंधरवड्याचे औचित्य साधून तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर व सौजन्याने भिंती फलक रंगविण्याचे आवाहन समुपदेशक विलास बोडके यांनी केले.

ठळक मुद्देअभिनव : शासकीय अधिकाऱ्यांचा स्वखर्चातून उपक्रम

दत्ता दिघोळे ।नायगाव : एचआयव्ही एड्स या दुर्धर आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्त्रीय व मूलभूत माहितीची जाणीवजागृती व्हावी या उद्देशाने शासकीय अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने परिसरातील भिंती बोलक्या करीत फलक लेखनासह विविध उपक्रम राबविले आहे.राष्ट्रीय युवादिन पंधरवड्याचे औचित्य साधून तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर व सौजन्याने भिंती फलक रंगविण्याचे आवाहन समुपदेशक विलास बोडके यांनी केले.एचआयव्ही एड्सला समूळ नष्ट करण्यासाठी दोडी ग्रामीण रुग्णालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड व डॉ. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती उपक्र म राबविण्यात येत आहे.आपली कृषी आधारित अर्थव्यवस्था जगात शाश्वत विकास धोरणांतर्गत मूलभूत घटकांसोबत आरोग्य हा महत्त्वपूर्ण व मूलभूत अधिकार असल्याने यावरदेखील एक महत्त्वपूर्ण उत्तम नियोजन आयोजन करून ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक बंधू-भगिनी यांनी बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये एचआयव्ही तपासणी कुठे कराल हे भिंती फलक दर्शनी भागात रंगवून राज्याला एचआयव्हीमुक्तीकडे नेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात पाऊल उचलले आहे. तालुक्यातील सार्वजनिक कामांवर आलेल्या साधनांवर एचआयव्ही एड्स मदतवाहिनी क्र मांक १०९७ ची स्टिकर स्व-खर्चाने छापून चिटकविले. या माध्यमातून जाणीवजागृती होऊन सामाजिकदायित्व निभावले. तसेच २०१८ मध्ये शिंदे टोल प्लाझावर टोल पावतीवरदेखील १०९७ हा क्र मांक महाराष्ट्रात सुरुवात होऊन आठ जिल्ह्यांनीदेखील सुरु वात केली.कलंक व भेदभाव समाज स्वीकृती, सामाजिक, नैतिक जबाबदारी व बांधिलकी याची उत्तम खूणगाठ बांधून ठेवण्याकरिता हा प्रयत्न होता. समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्देशाने हे काम हाती घेतले. तालुक्यातील प्रत्येक गावातील भिंती बोलक्या करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.- विलास बोडके,समुपदेशक दोडी, ग्रामीण रुग्णालय

टॅग्स :HIV-AIDSएड्सEducation Sectorशिक्षण क्षेत्र