शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांच्यावर उपचारासाठी विधानसभा अध्यक्षांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:54 IST

महाराष्टसदन घोटाळ्याप्रकरणी आॅर्थररोड कारागृहात जामिनाच्या प्रतीक्षेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत यासाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाच साकडे घातले आहे.

नाशिक : महाराष्टसदन घोटाळ्याप्रकरणी आॅर्थररोड कारागृहात जामिनाच्या प्रतीक्षेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत यासाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाच साकडे घातले आहे.भुजबळ हे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य असून, त्यांच्या खालावलेल्या  प्रकृतीची दखल घेऊन त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. त्यात म्हटले आहे की, भुजबळ यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, कारागृह प्रशासन त्यांची काळजी घेत नाही. त्यामुळे आपण स्वत: त्यात लक्ष घालावे, अशी विनंती करण्यात आली आहे. भुजबळ यांचे महाराष्टÑाच्या जडणघडणीत योगदान आहे. त्यांच्यावरील आरोपाची गेल्या दोन वर्षांत चौकशी होऊ शकली नाही हे प्रशासनाचे अपयश आहे. न्यायालयाकडे त्यांनी वारंवार अर्ज करूनदेखील सरकारी वकिलांकडून न्यायालयात गैरहजर राहणे यासारख्या घटना घडत असून, राजकीय आकसापोटी त्यांना जामीन मिळू दिला जात नाही. त्यामुळे भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी, हिंदुजा किंवा बॉम्बे रुग्णालयात योग्य ते उपचार होण्यासाठी आपल्या स्तरावरून आॅर्थररोड तुरुंग प्रशासनास आदेश द्यावेत, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.गेल्या २२ महिन्यांपासून छगन भुजबळ हे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असून, विशेष न्यायालयाने अलीकडेच त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी न्यायालयीन सुनावणीत भुजबळ यांना पाचारण करण्यात आल्यावर त्यांची प्रकृती खालावल्याची बाब निदर्शनास आली. त्यांना दम्याचा त्रास होत असून, दहा किलो वजन कमी झाल्याची तक्रार भुजबळ यांनी कारागृह प्रशासनाकडे केल्यावर त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले; परंतु औषधोपचार करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. त्या अनुषंगाने दीपिका चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ