शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हवी ‘एसपीसीए’समिती : मुक्या जीवांना मिळणारी क्रूर वागणूक थांबणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:20 IST

समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.

नाशिक : प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अ‍ॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे; मात्र अद्याप समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.राज्य सरकारने २००१ साली अध्यादेश काढून प्राणी क्रुरता प्रतिबंध समिती विविध जिल्ह्यांमध्ये गठित करावी, असे आदेश केंद्र सरकारच्या नियमानुसार दिले. त्यानंतर काही शहरांमध्ये अशाप्रकारची समिती गठित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र राज्यात काही मोजक्याच शहरांमध्ये या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारे समिती गठित करून या समितीद्वारे जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली शहर व परिसरात जनावरांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याची मागणी मानव उत्थान मंचकडून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिका-यांनी पशुसंवर्धन उपआयुक्तांसोबत चर्चा करून पंधरा सदस्य असलेली समिती शासनाच्या नियमानुसार गठित करण्याच्या सूचना दिल्या; मात्र यानंतर कुठल्याही प्रकारे प्रयत्न संबंधितांकडून होऊ शकले नाही, असा आरोप करत मंचाचे जसबीर सिंग, भारती जाधव, हेमंत जाधव, ज्योती ग्रोवर, प्रियंका वाघ, धनश्री कुलकर्णी, हेमल लडानी आदी प्राणिप्रेमींनी कार्यालयापुढे निदर्शने करीत नाशिकमध्ये ‘एसपीसीए’ का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक